- डॉक्टर गौरी पालवे-गर्जे यांचा जीव वाचला असता जर त्यांनी वडीलांचे ऐकले असते.
- गौरीची आत्महत्या नाही तर ही हत्या असल्याचा वडीलांचा आरोप.
- गौरीला जाणीवपूर्वक त्रास दिला जात होता असाही आरोप वडीलांनी केला आहे.
आकाश सावंत
डॉक्टर गौरी पालवे-गर्जे हीचा जिव वाचला असता. जर तिने तिच्या वडीलांनी सांगितले होते ते ऐकले असते. ही बाब आता समोर आली आहे. ही गोष्ट तिचे वडील अशोक पालवे यांनीच पत्रकार परिषदेत सांगितली. आम्ही पंकजा मुंडे यांच्याकडे पाहून आमची मुलगी अनंत गर्जे याला दिली होती. त्याचे पहिले लग्न झाले होते किंवा त्याचे काही विवाहबाह्य संबंध होते याची आम्हाला काही माहिती नव्हती. आमची मुलगी ही शिकलेली होती. तिला चांगला पगार होता. ती स्ट्राँग होती. त्यामुळे ती कधीच आत्महत्या करू शकत नाही. तिची ही आत्महत्या नाही तर हत्या आहे असा आपला आरोप असल्याचं या पत्रकार परिषदेत अशोक पालवे यांनी सांगितले. शिवाय यावेळी त्यांनी काही घरातल्या गोष्टी ही सांगितल्या.
1 ऑक्टोबरला मुलीच्या घरचं सामान शिफ्ट केलं जात होते. त्यावेळी तिचा पती म्हणजेच अनंतने तिला एक फाईल दिली होती. ही जपून ठेव. महत्वाची आहे असं ही तिला सांगितलं होतं. त्यावेळी ती कागदपत्र तिने पाहीली. त्यात अंबाजोगाईच्या एका मुलीची गर्भपाताची कागदपत्र होती. त्यावर पती म्हणून अनंत गर्जेचं नाव होतं. ही पाहून आपल्या मुलील धक्का बसला होता. त्यानंतर तिने हीबाब आपल्याला सांगितली होती असं अशोक पालवे म्हणाले. ही गोष्टा सर्वांसाठीच धक्कादायक होती.हे सर्व ऐकून आमच्या पायाखालची वाळू सरकली होती.
त्याच वेळी आपण गौरीला ते घर सोडून माहेरी यायला सांगितलं होतं. ऐवढचं असेव तर तू तिथे राहू नकोस. ती इकडे आली तर आपण समाजाची मिटींग बोलवू. जे काही आहे ते मिटींगमध्ये होईल. त्यामुळे तू आताच्या आता घरी निघून ये असं आपण आपली मुलगी गौरीला त्याच वेळी सांगितलं होतं. पण तीने येण्यास नकार दिली होता. माझा संसार उद्धवस्त होईल. मी तिकडे आले तर अनंतने आपल्याला आत्महत्येची धमकी दिली आहे. तो मरेल मला ही मारेल. सर्वच संपेल. त्यामुळे मला इथेच राहू द्या असं तिने सांगितलं होतं. मिटींग केली तर समाजात उलट सुलट चर्चा होईल. तसं करायला तिने विरोध केला. शिवाय घरी परत येण्यासही तिने नकार दिला. त्याच वेळी जर गौरीने वडीलांचे ऐकले असते तर तिचा आज जीव गेला नसता.
गौरीला ती कागदपत्र जाणीवपूर्वक दाखवली गेली होती असा दावाही पालवे यांनी केला आहे. त्यातून तिला त्रास देण्याचा डाव होता असा त्यांनी आरोप केला. मुलीला त्रास होत आहे हे समजल्यावर आम्ही ही तिच्याकडे लक्ष देत होतो. तिचा पती अनंतच्या वाढदिवसाला आम्ही तिला भेटायला गेली होतो. त्यावेळी आपण या विषयावर अनंत बरोबर बोलणार होतो. पण त्याच वेळी गौरीने आपल्याला रोखलं होतं. तुम्ही त्याला काहीच बोलू नका असं ही तिने बजावलं होतं. त्यामुळे आपण त्याला काहीच बोललो नाही असं ही त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं.
आपली मुलगी आत्महत्या कधीच करू शकत नाही. तिची हत्याच आहे. नातेवाईक नसताना पंचनामा कसा झाला? तिच्या शरिरावर मारहाणीच्या जखमी होत्या. त्या आपण पाहिल्या आहेत. मी स्वत: डॉक्टर आहे. त्यामुळे फाशी घेतली असती तर त्याचे मार्क्स हे वेगळे असतात असं ही पालवे यांनी सांगितले. सुरूवातीला आम्हाला विष घेतलं आहे असं सांगितलं गेलं. त्यानंतर तिने फाशी घेतल्याचं सागून डेडबॉडीच आमच्या समोर असल्याचं सांगण्यात आलं. आम्हाला न्याय हवा आहे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहीजे. त्यांचे सीडीआर तपासा. शिवाय चौकशीत काय होत आहे याची कल्पनाही आम्हाला द्या अशी मागणी ही गौरीच्या वडीलांनी केली आहे. शिवाय आरोपीचा भाऊ आणि बहीण अजूनही बाहेर आहेत. त्यांनाही अटक झाली पाहीजे अशी मागणी त्यांनी केली.