ऋतिक गणकवार, मुंबई:
Dr. Gauri Garje Suicide Case: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या, मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गौरी गर्जे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. लग्नानंतरही पतीचे बाहेर असल्याच्या तणावातून ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दुसरीकडे गौरी यांच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबईच्या वरळी भागात राहणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीने आत्महत्या केल्याचं समोर आले आहे. अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी गर्जे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. फेब्रुवारी महिन्यातच त्यांचा मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला होता. लग्नानंतर अवघ्या १० महिन्यातच गौरी गर्जे यांनी जीवन संपवल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सहा वाजता गौरी गर्जे यांचे पती अनंत गर्जे यांनी त्यांच्या आईला फोन करुन तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे, ती तिला नायर रुग्णालयात घेऊन आल्याची माहिती दिली. या बातमीने गर्जे कुटुंबिय हादरुन गेले. गौरी गर्जे यांचा सासरच्या मंडळींकडून छळ सुरु होता. गौरी गर्जे घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरल्यात. ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा आरोप कुटुंबियांनी केला असून वरळी पोलीस ठाण्यात अनंत गर्जे यांच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
पहिलं लग्न लपवलं, कुटुंबियांचे गंभीर आरोप!
गौरी गर्जे- पालवे या डॉक्टर असून त्यांनी सायन रुग्णालयात प्रॅक्टिस केली होती, त्या सध्या केएम रुग्णालयात कार्यरत होत्या. अनंत गर्जे यांचे पहिले लग्न झाले होते, मात्र याबद्दल गौरी गर्जे यांना माहिती नव्हती. काही दिवसांपूर्वीच गौरी गर्जे यांना याबद्दल समजले, तेव्हापासून त्या तणावात होत्या, त्या घटस्फोट घेण्याच्या तयारीत होत्या, मात्र त्याआधीच त्यांनी स्वत:ला संपवले.
Virar News: आधी VIDEO कॉल, नंतर उचलले टोकाचे पाऊल.. विरारमधील हृदयद्रावक घटना
गौरीचा छळ सुरु होता. पैशासाठी तिला मारहाण केली जात होती. ही आत्महत्या नाही हत्या आहे. अनंत गर्जेचे बाहेर अफेयर होते, त्याचे चॅटिंगही मुलीला सापडले होते, त्यावरुनच दोघांमध्ये वाद सुरु होते. कालही दुपारपासून त्यांच्यात वाद सुरु होते. पती अनंत गर्जे यांनीच त्यांची हत्या केली आणि आता फरार झाला. असा आरोप गौरी गर्जेंच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, यावर अनंत गर्जे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "घटना घडली त्यावेळी मी घरी न्हवतो, घरी पोहोचलो तेंव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते, घाबरून ३१ व्या मजल्यावरून खिडकीतून उतरून मी ३० व्या मजल्यावरच्या माझ्या घरात प्रवेश केला तेव्हा गौरी गळफास घेतल्या अवस्थेत होती," असं त्यांनी म्हटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world