दिवाकर माने, परभणी
चहा व सिगारेट न दिल्याच्या रागातून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत एकाची हत्या केल्याची घटना मंगळवारी गंगाखेड शहरातील गोदावरी नदी घाटावर घडली आहे. याप्रकरणी मयताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आवेज खान गफार खान, जुनेद खान जरावर खान यांनी किशोर मंचक भालेराव याच्या सांगण्यावरून मारोती तुकाराम साळवे यांच्याकडे चहा आणि सिगारेट मागितले. मात्र चहा, सिगारेट घेऊन पैसे देत नसल्यामुळे मारोती साळवे यांनी त्यांना चहा, सिगारेट देण्यास नकार दिला. यातून झालेल्या वादात आवेज खान गफार खान, जुनेद खान जरावर खान आणि किशोर भालेराव यांनी साळवे यांना मारहाण केली.
(नक्की वाचा- Hingoli News: चिमुकलीसह आईनं घेतली विहीरत उडी, टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण काय?)
"तुम्ही नेहमी चहा सिगारेट घेऊन पैसे देत नाहीत, आम्हाला का त्रास देता?" असं विचारले म्हणून आवेज खान आणि जुनेद खान यांनी किशोर मंचक भालेराव याच्या सांगण्यावरून मारोती तुकाराम साळवे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या पोटात लाथा मारून, डोक्यावर खाली पाडून छातीमध्ये, पोटामध्ये अवघड जागेवर लाथा-बुक्क्याने मारहाण केली. या बेदम मारहाणीत साळवे यांचा मृत्यू झाला.
(नक्की वाचा- Healthy Drinks: उष्णतेवर मात करतील 'ही' 5 थंडगार पेय, अवघ्या 2 मिनिटांत तयार करा आणि प्या!)
अरविंद मारोती साळवे यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा व अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना तिन्ही आरोपींना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे करत आहेत.