दिवाकर माने, परभणी
Parbhani News: शाळेच्या फी वादातून संस्था चालकाने विद्यार्थीनीच्या वडिलांना केलेल्या मारहाणीत त्यांचा मृ्त्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथे असलेल्या हायटेक रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी संस्थाचालक प्रभाकर चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जगन्नाथ पांडुरंग हेंडगे यांनी आपली मुलगी पल्लवी हिचा दाखला या शाळेत घेतला होता. दाखला घेते वेळी काही अॅडमिशन फीस देखील त्यांनी भरली होती. परंतु भरलेले पैसे हे कमी आहेत आणि पूर्ण अॅडमिशन फी भरावी असे संस्थाचालक प्रभाकर चव्हाण यांनी सांगितले. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली.
(नक्की वाचा- Pandharpur News: आमदाराकडे एक कोटींच्या खंडणीची मागणी, कथित कामगार नेत्याला अटक; काय आहे प्रकरण?)
या वादात संस्थाचालक प्रभाकर चव्हाण याने उर्वरित पैसे न भरल्याचा राग मनात धरून जगन्नाथ पांडुरंग हेंडगे यांना शिवीगाळ करून मारहाण देखील केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यां अगोदर देखील या संस्थेबद्दल अनेक वाद समोर आले होते. पण त्यात कोणतीही ठोस कारवाही झाली नाही.
(नक्की वाचा- Dhule Cash Case: शिंदेंचा आणखी एक आमदार अडचणीत! 'धुळे कॅश' प्रकरणात कोर्टाचे मोठे आदेश)
पूर्णा तालुक्याच्या झिरो फाटा, एरंडेश्वर येथे असलेली हायटेक रेसिडेन्शिअल स्कूलचे संस्था चालक प्रभाकर चव्हाण आणि त्याच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत हेंडगे यांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी पूर्णा पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणात संस्थाचालक प्रभाकर चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रकरणात पुढील तपास पोलीस करत आहेत.