Parbhani News : सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच; न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवाल आला समोर

Somnath Sutryavanshi Death Case : अखेर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवाल समोर आला आहे, ज्यात पोलिसांच्या मारहाणीतचं सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, NDTV मराठी

परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूने संपूर्ण राज्य हादरले होते. पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी केला होता. मात्र सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे. अखेर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवाल समोर आला आहे, ज्यात पोलिसांच्या मारहाणीतचं सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

न्यायदंडाधिकाऱ्यांचा गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर संबंधित सर्व पोलिसांना नोटीसा बजावून उत्तर मागवण्यात आली आहेत. मानवाधिकार आयोगाने याप्रकरणी राज्याचे मुख्य सचिव, गृह सचिव, अतिरिक्त पोलिस महासंचालक (गुन्हे), परभणी सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक यांनाही नोटीस बजावली आहे.

(नक्की वाचा-  Govt Employee : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; पेन्शनबाबत सरकारचा मोठा निर्णय)

न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांवर ठपका ठेवून त्यांची नावेही दिलेली असल्याने त्या प्रत्येक पोलिसांना परभणी पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत नोटीस देण्यात यावी. जेणेकरून त्या सर्वांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळेल', असे आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

(नक्की वाचा- रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मुजोरीला चाप लागणार; नियमबाह्य भाडे आकारणाऱ्यांची WhatsApp वर करता येणार तक्रार)

काय आहे प्रकरण?

सोमनाथ सूर्यवंशी यांचा 15 डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत असताना तुरुंगात मृत्यू झाला होता. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला. त्यांच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. शवविच्छेदन अहवालातून या गोष्टी समोर आल्या होत्या. मात्र सरकारने या प्रकरणी संबंधीत पोलिसांवर काहीही कारवाई केली नव्हती. सूर्यवंशी कुटुंबीय या प्रकरणी सातत्याने दोषींवर कारवाईची मागणी करत आहेत.  

Advertisement