Malegaon Factory Election: बारामतीत हायहोल्टेज ड्रामा! PDCC बँक रात्री 11 वाजता उघडी, पैसे वाटल्याचा आरोप

बारामतीमधील पीडीसीसी बँक रात्री 11 पर्यंत सुरु होती, तिथे सभासदांच्या याद्या होत्या, असा खळबळजनक आरोप बचाव शेतकरी पॅनलने केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

देवा राखुंडे, बारामती: बारामतीमध्ये सध्या माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचे धुमशान सुरु आहे. या निवडणुकीमुळे बारामतीचे राजकारण चांगलेच तापले असून स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार मैदानात उतरल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता बारामतीमधील पीडीसीसी बँक रात्री 11 पर्यंत सुरु होती, तिथे सभासदांच्या याद्या होत्या, असा खळबळजनक आरोप बचाव शेतकरी पॅनलने केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, बारामतीमधील आमराई परिसरातील पीडीसीसी बँक दिनांक 18 जून रोजी रात्री 11 वाजून 12 मिनिटांच्या वेळेला चालू होती. असा आरोप करण्यात आला आहे. या ठिकाणी बँकेत काही खाजगी लोक ही होते.बँकेतील कॉम्प्युटर यंत्रणा चालू होती. या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या याद्याही होत्या असा दावा सहकार बचाव शेतकरी पॅनल कडून करण्यात आला.याची माहिती मिळताच सहकार बचाव शेतकरी पॅनलचे रंजनकुमार तावरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रात्रीच्या वेळी बँकेत दाखल झाले. 
 
रात्रीच्या वेळी बँकेमध्ये खाजगी व्यक्ती कशासाठी पाठवण्यात आल्या होत्या? त्या ठिकाणी कारखान्याच्या मतदार याद्या टेबलावरती का ठेवण्यात आल्या? होत्या असा सवाल रंजनकुमार तावरे यांनी विचारला आहे. या पुढील काळात माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत बारामतीत ठोशास ठोस उत्तर दिलं जाईल. कोणाचीही दादागिरी आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही असा इशारा देत रंजनकुमार तावरे यांनी घडलेल्या प्रकारासंबंधी  कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Pune Palkhi 2025 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण; कसा असेल पालखीमार्ग, पाहा वेळापत्रक )

Topics mentioned in this article