Shocking news: शाळेच्या कार्यक्रमात पाकिस्तानी गीत? तक्रार दाखल, शाळेचे म्हणणे काय?

या घटनेमुळे उमरखेड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रतिक राठोड 

शाळांमध्ये सध्या स्नेहसंमेलनं सुरू आहेत.  शाळांमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात आपण मराठी किंवा हिंदी गीतांवरील डान्स पाहातो. पण एक अशी शाळा आहे ती सध्या वादात अडकली आहे. त्याला कारण ही तसेच आहे. ते म्हणजे या शाळेच्या कार्यक्रमात चक्क पाकिस्तानी लष्करी गीत सादर केले गेले. त्यावर विद्यार्थ्यांचा डान्स बसवण्यात आला होता. याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या विरोधात तक्रार ही दाखल करण्यात आली आहे.  
 
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे ही घटना घडली आहे. अमरखेडच्या नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 2 मध्ये स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच स्नेहसंमेलनात वादग्रस्त प्रकार समोर आला आहे. या कार्यक्रमात “ये मर्द-ए-मुजाहिद, तेरी एल्गार क्या है” या गीतावर गायन आणि नृत्य सादर करण्यात आल्याचा आरोप होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे एक पाकिस्तानी गाणं आहे. पाकिस्तानी लष्कराचे गाणे म्हणून त्याची ओळख आहे असं ही सांगितलं जात आहे.  

नक्की वाचा - Shocking news: खड्ड्याने 6 वर्षाच्या चिमुकलीचा जीव घेतला!, खेळता खेळता घात झाला, जबाबदार कोण?

पाकिस्तानसाठी लष्करी स्फूर्ती गीत म्हणून हे गाणं ओळखले जाते, असा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर उमरखेड भाजपचे पदाधिकारी गोपाळ कलाने यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.  शालेय कार्यक्रमात अशा प्रकारच्या गीतांचे सादरीकरण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत असं गोपाळ कलाने यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे उमरखेड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

नक्की वाचा - Traffic Jam: जुना पुणे–मुंबई महामार्गावर पनवेल टोल नाक्यावर राडा, गाड्यांच्या 2 किलोमीटर पर्यंत रांगा

दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबाबत शाळेची बाजू जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र शाळेच्या जबाबदार व्यक्तीशी संपर्क होवू शकला नाही. या शिवाय हे सादरीकरण कोणाच्या परवानगीने झालं? यात शाळा प्रशासनाची भूमिका काय होती? यामागे नेमका उद्देश काय होता? याचा तपास केला जात आहे. मात्र या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता तरी शाळा प्रशासन पुढे येवून हा नक्की प्रकार काय आहे याचे स्पष्टीकरण करणार आहे की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.