PCMC News: दोघं एकत्र राबायचे, पण 'त्या' दिवशी बिनसलं; सहकाऱ्यानेच तरुणाला दिला भयंकर मृत्यू

केशव कुमार महतो असे मृत पावलेल्या कामगाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड:

Pimpri Chinchwad Crime:  पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकर वाडी परिसरात एका बांधकाम साइटवर दोन कामगारांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान भीषण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका कामगाराचा दुर्दैवी अंत झाला आहे. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

किरकोळ वादातून हत्या 

समोर आलेल्या माहितीनुसार, रागाच्या भरात एका कामगाराने दुसऱ्याला इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले, ज्यामध्ये २६ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. केशव कुमार महतो असे मृत पावलेल्या कामगाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे.

Advertisement

Accident News: काँग्रेस खासदाराच्या कारचा भीषण अपघात! ट्रकची धडक, आलिशान फॉर्च्युनरचा चक्काचूर

या ठिकाणी केशव महतो आणि अन्य एक कामगार सोबत काम करत होते. कामाच्या ठिकाणीच दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी कामगाराने संतापाच्या भरात केशवला दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली ढकलून दिले. इमारतीवरून खाली कोसळल्यामुळे गंभीर इजा होऊन केशवचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. किरकोळ वादातून तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने बांधकाम मजुरांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे.

Satara News: सातारा ZP निवडणुकीचा राडा भोवला! SP तुषार दोशी सक्तीच्या रजेवर; गृह विभागाचे आदेश

Topics mentioned in this article