Moshi Accident: मोशी दुर्घटनेत सर्वात मोठी अपडेट! तिघांचे मृतदेह सापडले; नातेवाईकांचा आक्रोश

घटनास्थळावर उपस्थित असलेले भाजपचे विधान परिषदेचे आमदार आमदार अमित गोरखे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:

Moshi Building Collapse Accident Update:  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील प्रशासकीय इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेला ६५ तास उलटूनही तळमजल्याच्या मलब्याखाली अडकलेल्या ८ कर्मचाऱ्यांचा शोध लागलेला नाही. अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असतानाच एक मोठी अपडेट समोर आली आहे. या दुर्घटनेत अडकलेल्यांपैकी आणखी तिघाचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. 

मोशी दुर्घटनेत सर्वात मोठी अपडेट, तिघांचा मृत्यू 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीतील मोशी येथे कचऱ्याचा डोंगर कोसळून तीन मजल्याची इमारत कोसळल्याची घटना घडल्यानंतर 68 तास उलटले असले तरी त्यात गाडले गेलेल्या आठ कर्मचाऱ्यांचा तपास लागलेला नाही. अशातच या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळावर उपस्थित असलेले भाजपचे विधान परिषदेचे आमदार आमदार अमित गोरखे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

Advertisement

Moshi Accident: मोशी दुर्घटनेत सर्वात खळबळजनक खुलासा! कोसळलेली इमारत अनधिकृत? परवानगीच नसल्याचं समोर

इमारत अनधिकृत? आयुक्तांचा माध्यमांवर संताप

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील प्रशासकीय इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेला ६५ तास उलटूनही तळमजल्याच्या मलब्याखाली अडकलेल्या ५ कर्मचाऱ्यांचा शोध लागलेला नाही. अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असतानाच, या इमारतीबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

या इमारतीला केवळ तळमजल्याच्या पूर्णत्वाचा दाखला (सीसी) होता, तर वरच्या दोन मजल्यांच्या बांधकामाला कोणतीही परवानगी नव्हती. केवळ २४ तासांत हा दाखला कोणाच्या सांगण्यावरून देण्यात आला, असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या बेकायदेशीर बांधकामाबाबत पत्रकारांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांना जाब विचारला असता, त्यांनी प्रश्नांची उत्तरे देणे टाळत उलट पत्रकारांवरच तीव्र संताप व्यक्त केला.