जाहिरात

Moshi Accident: मोशी दुर्घटनेत सर्वात खळबळजनक खुलासा! कोसळलेली इमारत अनधिकृत? परवानगीच नसल्याचं समोर

इमारतीबाबत एक धक्कादायक आणि गंभीर खुलासा समोर आला असून, केवळ तळमजल्यालाच महापालिकेच्या बांधकाम विभागाने २७ जुलै २०२३ रोजी पूर्णत्वाचा दाखला दिला असल्याचे उघड झाले आहे.

Moshi Accident: मोशी दुर्घटनेत सर्वात खळबळजनक खुलासा! कोसळलेली इमारत अनधिकृत? परवानगीच नसल्याचं समोर

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड

Moshi Buliding Collapse: पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेत बचावकार्य अद्याप सुरु असून ८ जणांचा मृत्यूशी खेळ सुरु आहे. या दुर्घटनेच्या बचावकार्यावरुन प्रशासनावर गंभीर आरोप होत आहेत. अशातच वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या दुर्घटनाग्रस्त तीन मजली प्रशासकीय इमारतीबाबत एक धक्कादायक आणि गंभीर खुलासा समोर आला असून, केवळ तळमजल्यालाच महापालिकेच्या बांधकाम विभागाने २७ जुलै २०२३ रोजी पूर्णत्वाचा दाखला दिला असल्याचे उघड झाले आहे.

Moshi Incident: 'सगळा अंधार झाला अन् आम्ही अडकलो', 6 तास समोर साक्षात मृत्यू; मोशी दुर्घटनेचा थरारक अनुभव

मोशी दुर्घटनेबाबत धक्कादायक खुलासा... 

समोर आलेल्या माहितीनुसार, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्या उभारणीसाठी कोणतीही परवानगी मागितल्याचा किंवा दिल्याचा पुरावाच उपलब्ध नसल्याची कबुली शहर अभियंता मनोज सेठिया यांनी दिली आहे; तरीही या अनधिकृत मजल्यांवर कँटीन आणि कॉन्फरन्स रूम बेधडकपणे सुरू करण्यात आल्या होत्या.

धक्कादायक बाब म्हणजे, महापालिकेच्या पर्यावरण विभागाने २६ जुलै रोजी सुधारित बांधकामाची परवानगी मागितली आणि बांधकाम विभागाने कोणतीही प्रत्यक्ष पाहणी न करता अवघ्या २४ तासांत, म्हणजेच २७ जुलैला घाईघाईने पूर्णत्वाचा दाखला मंजूर करण्याची संशयास्पद तत्परता दाखवली. केवळ तळमजल्याची परवानगी असताना वरचे दोन बेकायदेशीर मजले कोणाच्या वरदहस्ताने उभे राहिले आणि तिथे कामगारांना काम करण्याची परवानगी कोणी दिली, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

तब्बल ६५ तास चाललेल्या या थरारात एका कामगाराचा मृत्यू आणि 8 जणांच्या जीवाशी खेळ झाला असून, या निष्पाप जीवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या दुर्घटनेची मुख्य जबाबदारी तत्कालीन पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची की संबंधित कंत्राटदार कंपनीची, याबाबत आता तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नातेवाईकांचा आक्रोश, आयुक्तांना घेराव

कचरा डेपो दुर्घटनेतील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांना रात्री उशिरा घेराव घालत प्रशासनाला धारेवर धरले. नुकतेच लग्न झालेल्या व लहान मुले असलेल्या अक्षय गायकवाड सारख्या कर्मचाऱ्यांच्या भवितव्याबाबत आणि संभाव्य दगाफटका झाल्यास मिळणाऱ्या भरपाईबाबत नातेवाईकांनी आक्रमक सवाल उपस्थित केलेत.

Pune News: मोशी दुर्घटना, 40 तास उलटले, 'त्या' लोकांचा श्वास अजूनही कोंडलेलाच, रेस्क्यू टीमने आखलाय मोठा प्लॅन

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com