PMC Election 2026: उमेदवारीवरुन कलह! पठ्ठ्याने एबी फॉर्म गिळून विषयच संपवला, पुण्यात काय घडलं?

उद्धव कांबळे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी हा फाटलेला एबी फॉर्म खाऊन टाकला. या धक्कादायक प्रकाराने निवडणूक केंद्रात एकच खळबळ माजली.

जाहिरात
Read Time: 2 mins

अविनाश पवार, पुणे: 

Pune Municiple Corporation Election 2026: राज्याच्या राजकारणात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. महापालिका निवडणुकीत उमेदवारीवरुन कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा पाहायला मिळत आहे. पक्षाकडून एबी फॉर्म मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये अक्षरश:  हमरी-तुमरी पाहायला मिळत आहे. पुण्यामधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यामध्ये एका इच्छुक उमेदवाराने थेट एबी फॉर्मच गिळून खाऊन टाकल्याचा आरोप होत आहे. 

थेट एबी फॉर्म गिळून टाकला...

पुण्याच्या धनकवडी-सहकारनगर भागामध्ये इच्छुक उमेदवाराने थेट एबी फॉर्मच खाऊन टाकल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 36 अ मधून शिवसेनेकडून मच्छिंद्र ढवळे आणि उद्धव कांबळे यांना एबी फॉर्म दिले गेले. मात्र या दोन्ही उमेदवारांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांच्या हातातील शिवसेनेचा अधिकृत एबी फॉर्म हिसकावला आणि फाडला. उद्धव कांबळे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी हा फाटलेला एबी फॉर्म खाऊन टाकला. या धक्कादायक प्रकाराने निवडणूक केंद्रात एकच खळबळ माजली.

Pune News : पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीला मोठा धक्का, करिष्मा बारणेंसह या उमेदवारांचे AB फॉर्म रद्द, कारण काय?

नेमकं काय घडलं? 

मिळालेल्या माहितीनुसार, एकाच प्रभागात पक्षाकडून चुकून दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. यामुळे शिवसेनेचे उमेदवार उद्धव कांबळे आणि मच्छिंद्र ढवळे यांच्यात जोरदार वाद झाला. या वादादरम्यान उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांचा एबी फॉर्म हिसकावून घेतला आणि तो फाडून गिळून टाकल्याचा प्रकार घडला. 

दरम्यान, या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत होती. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला. निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान शासकीय कामकाज करत असलेल्या लोकसेवकाच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Pune PMC election: पुण्यात युती का तुटली? 15 जागांवरून चर्चा फिस्कटली; वाचा Inside Story