Pune PMC Election 2026: पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील युती का तुटली. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत चर्चा सुरु असताना युती का तुटली याची 'इनसाईड स्टोरी' समोर आली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र लढतील अशी चिन्हे असतानाच ही युती अचानक तुटली. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे जागावाटपाचा तिढा आणि विशिष्ट प्रभागांमधील उमेदवारीचा आग्रह.
NDTV मराठीला मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेने सुरुवातीला ३५ ते ४० जागांची मागणी केली होती. मात्र, भाजपने केवळ १५ जागा देण्याची तयारी दर्शवली. विशेष म्हणजे, शिवसेना १५ जागांवर लढण्यास तयारही झाली होती. २९ डिसेंबरला १५ नावांची यादी भाजपला पाठवण्यात आली, पण ती पाहताच भाजपने चर्चा थांबवली.
(नक्की वाचा- BMC Election: मुंबईत युती आघाडीची स्थिती काय? 227 पैकी कोण किती जागा लढवणार? वाचा संपूर्ण आकडेवारी)
युती तुटण्याचे मुख्य कारण
प्रभाग क्रमांक २४ ड: हा या वादाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला. या प्रभागातून भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर रिंगणात आहेत. याच जागेवर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपल्या मुलासाठी, प्रणव धंगेकरसाठी उमेदवारी मागितली होती. भाजपने आपल्या प्रमुख नेत्याच्या विरोधात धंगेकरांच्या मुलाला उमेदवारी देण्यास स्पष्ट नकार दिला आणि इथूनच युती तुटण्याची ठिणगी पडली.
(नक्की वाचा- Navi Mumbai: AB फॉर्म मिळाले, सगळी तयारीही केली, मात्र अखेरच्या क्षणी ट्विस्ट; भाजपच्या 13 उमेदवारांची फसवणूक?)
शिवसेनेच्या (शिंदे गट) 'त्या' १५ उमेदवारांची यादी
- ४१ ब - प्रमोद (नाना) भानगिरे
- ४१ क - स्वाती अनंत टकले
- २४ ड - प्रणव रवींद्र धंगेकर
- २३ क - प्रतिभा रवींद्र धंगेकर
- २६ ड - उल्हास उर्फ वसंतराव बागुल
- ३७ क - गिरीराज तानाजी सावंत
- ३७ ड - रूपाली रमेश कोंडे
- ३८ क - वनिता जालिंदर जांभळे
- ३८ इ - स्वराज नमेश बाबर
- ३९ क - मनिषा गणेश मोहिते
- ६ ड - आनंद रामनिवास गोयल
- ३ क - गायत्री हर्षवर्धन पवार
- १६ ड - उल्हास दत्तात्रय तुपे
- ४० ड - दशरथ काळभोर / गंगाधर बधे
- ११ क - वैशाली राजेंद्र मराठे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world