Pune News: हगवणे प्रकरणानंतर पोलीस अलर्ट! शस्त्र परवान्याबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

Pune Vaishnavi Hagawane Case Update: 2020 ते 2023 या काळात मोठ्या प्रमाणात पिस्तूल परवाने दिले गेल्याचेही उघडकीस आले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. या प्रकरणानंतर पुण्यामधील परवाना धारक शस्त्रांबाबत धक्कादायक माहितीही समोर आली होती, ज्यावरुन पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप झाले होते. या सगळ्या प्रकरणामुळे पुणे पोलीस आयुक्तांनी शहरामध्ये नवीन शस्त्र परवाना मिळवण्याच्या प्रक्रियेला ब्रेक लावला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यात नवीन पिस्तूल परवानासाठी पोलीस आयुक्ताने ब्रेक लावल्याची महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी नव्याने शस्त्र परवाना देणे पूर्णपणे थांबवले असून 400 अर्ज नाकारल्याचेही समोर आले आहे. हगवणे प्रकरणानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी शशांक हगवणे निलेश चव्हाण आणि सुशील हगवणे यांना पुणे पोलीस आयुक्तातून परवाना मिळाला होता. 2022 मध्ये संबंधित लोकांनी पोलिसांची दिशाभूल करून हा परवाना मिळवल्याचे समोर आले होते. तसेच 2020 ते 2023 या काळात मोठ्या प्रमाणात पिस्तूल परवाने दिले गेल्याचेही उघडकीस आले होते.

Bengaluru Stampede : कुणी दबलं, कुणी चिरडलं... RCB विजेतेपदाच्या जल्लोषातील चेंगराचेंगरीचे 5 भयानक Video

दरम्यान, पुण्यामध्ये गेल्या दीड वर्षात 19 परवाने दिली त्यातील 10 परवाने वारसा हक्काने तर नऊ जणांना खेळाडू कोट्यातून परवाना दिला आहे. ज्याबाबतची धक्कादायक आकडेवारीही समोर आली होती. या सर्व प्रकरणानंतर पुणे पोलीस आता अलर्ट मोडवर आले असून नवीन परवाने देणे पूर्णपणे बंद केले आहे. 

Advertisement