
Chinnaswamy Stadium Stampede: बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (Royal Challengers Bengaluru) फॅन्स मोठ्या संख्येने जमले होते. हे फॅन्स त्यांच्या लाडक्या टीमच्या पहिल्या विजेतेपदाच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी येथे जमले होते. पण, या जल्लोषाला गालबोट लागलं. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. तर 50 पेक्षा जास्त जणांना मृत्यू झाला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ते देखील खूप भयानक आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी लाठीचार्ज केला का?
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये तसंच स्टेडियमच्या बाहेर खूप गर्दी होती आणि कर्नाटक पोलिसांनी गर्दी नियंत्रित करण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला. याचवेळी चेंगराचेंगरी झाली आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असे सांगितले जात आहे. यावेळी सर्व फॅन्स फक्त आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होते.
VIDEO | Karnataka police use mild force to manage the crowd gathered outside M Chinnaswamy Stadium in Bengaluru.
— Press Trust of India (@PTI_News) June 4, 2025
Royal Challengers Bengaluru fans have arrived in large numbers as Karnataka State Cricket Association has organised a felicitation ceremony of Royal Challengers… pic.twitter.com/nAw5GtHG6O
स्टेडियमबाहेर अनेक फॅन्स बेशुद्धही पडले आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. बेशुद्ध पडलेल्या चाहत्यांना रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यासाठी लोक एकमेकांना मदत करताना दिसले.
🔴 #BREAKING : RCB की जीत के जश्न के दौरान भगदड़, एक महिला सहित 7 लोगों की मौत#Bengaluru | #ChinnaswamyStadium | @RajputAditi | @Vimalsports | @ashutoshjourno pic.twitter.com/0arGQ5JUS6
— NDTV India (@ndtvindia) June 4, 2025
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या आयपीएल 2025 मधील विजयाचा जल्लोष करण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर एक लहान मूल बेशुद्ध पडले.
VIDEO | Child faints outside Bengaluru's Chinnaswamy Stadium as a massive crowd gathers to celebrate Royal Challengers Bengaluru's IPL 2025 victory.
— Press Trust of India (@PTI_News) June 4, 2025
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvqRQz)' pic.twitter.com/fFqKswmm3y
बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील कारवर फॅन्स चढले होते. त्यामध्ये कारचे नुकसान झाले. फॅन्स एकावर एक चढून स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते.
#WATCH | A car was damaged after fans climbed over it outside the M Chinnaswamy Stadium in Bengaluru
— ANI (@ANI) June 4, 2025
A large number of #RoyalChallengersBengaluru fans have turned up here to catch a glimpse of their champion team.
A special felicitation ceremony for all RCB players has been… pic.twitter.com/WuNrbo5Bzh
मोठ्या संख्येने फॅन्स त्यांच्या चॅम्पियन टीमची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जमले होते.
VIDEO | Fans climb trees and buses as massive crowds gather outside Chinnaswamy Stadium to catch a glimpse of IPL 2025 champions, Royal Challengers Bengaluru.
— Press Trust of India (@PTI_News) June 4, 2025
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/khqxFnpYRt
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world