मनोज सातवी, प्रतिनिधी
Jawhar Municipal Council Results : साधारण दीड तासांपासून नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान जव्हारमधून मोठी बातमी समोर आली आहे. जव्हार नगरपरिषदेवर भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विजयी झाला आहे. तर 20 पैकी 14 जागांवर भाजप विजयी झाला असून राष्ट्रवादी अजित पवार 3, NCP शरद पवार 1 तर शिवसेना शिंदे गटाच्या 2 जागांवर विजयी झाले आहेत.
भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पूजा उदावंत विजयी...
२ डिसेंबर रोजी जव्हार नगरपरिषदेवर मतदान झालं होतं. जव्हार नगर परिषदेतील २० जागांसाठी तब्बल ६९ उमेदवार तर नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार रिंगणात होते.
राज्यातील 288 नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल आज ( रविवार 21 डिसेंबर) जाहीर होणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर वर्षभरांनीच राज्यात ही निवडणुकांची रणधुमाळी झाली. त्यामुळे या निवडणूक निकालांना विशेष महत्त्व आहे.