Porsche Accident Pune Case: आरोपीच्या आजोबांना अटक, ड्रायव्हरला धमकावल्याचा आरोप

Porsche Accident Pune Case: आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

Porsche Accident Pune Case: आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. ड्रायव्हरवर दबाव टाकून त्याला धमकावल्या प्रकरणी सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सुरेंद्रकुमार अग्रवालांविरोधात येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

(नक्की वाचा: विशाल अग्रवालच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवार चिडून म्हणाले...)

अपघात प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखा करणार 

पोर्शे कार अपघात प्रकरणाचा तपास सहा दिवसानंतर आता पुणे गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. 19 मे 2024 रोजी झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. आरोपी अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवून एक बाईकला धडक दिली होती. या अपघातात बाईकवरील अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. 

VIDEO: Pune Porsche Accident | प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, 2 पोलीस निलंबीत; अजित पवार काय म्हणाले?

(नक्की वाचा: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, विशाल अग्रवालसह सर्व 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी)

निष्पांपाचा जीव गेल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. वाढत्या दबावामुळे आता पुणे गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आला आहे. अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे या प्रकरणाचा तपास करणार आहेत.

(नक्की वाचा: 2 FIR, 2 ब्लड रिपोर्ट, अपघातावेळी कार कोणी चालवली? पुणे पोलीस आयुक्तांच्या पीसीमध्ये मोठे खुलासे)

आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी शुक्रवारी (24 मे 2024) सर्व सहा आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल, कोझी हॉटेलचा मालक प्रल्हाद भुतडा, कोझी हॉटेलचा व्यवस्थापक सचिन काटकर, संदीप सांगळे ब्लॅक बारचा मालक, हॉटेल कर्मचारी नितेश शेवाणी आणि जयेश गावकर अशी आरोपींची नावे आहेत. 

Advertisement

दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई

दरम्यान तपासामध्ये दिरंगाई केल्याबाबत तसेच अपघाताची माहिती वेळेमध्ये वरिष्ठ पोलिसांनी न दिल्याचा ठपका ठेवत दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.  

VIDEO: Pune Car Accident: अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवालना अटक, कारण...