
Prajakta Mali Trimbakeshwar Dance : भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर एक महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे. देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. उद्या 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीनिमित्ताने येथे लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. दरम्यान महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वरमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मंदिर संस्थानकडून हे आयोजन करण्यात आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मात्र या नृत्याच्या कार्यक्रमाला माजी विश्वस्त ललिता शिंदे यांच्याकडून विरोध केला जात आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात सेलिब्रिटींच्या इव्हेंटची परंपरा नाही. धार्मिक वातावरण बिघडून चुकीचा पायंडा पाडू नये अशी ललिता शिंदे यांची पुरातत्व खाते आणि पोलिसांकडे मागणी केली आहे. महाशिवरात्रीला लाखो भाविक त्र्यंबकेश्वरला दर्शनाला येतात आणि या कार्यक्रमाला गर्दी होऊन काही दुर्घटनाही होऊ शकतात अशी चिंता शिंदे यांनी व्यक्त केली आहे.त्र्यंबकेश्वरच्या इतिहासात यापूर्वी कधीच सेलिब्रिटींना घेऊन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं नाही. महाशिवरात्रीला आधीच लाखो संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यात सेलिब्रिटींचा कार्यक्रम ठेवल्यास चेंगराचेंगरीची भीती व्यक्त करीत शिंदे यांनी या कार्यक्रमाला विरोध केला आहे.
नक्की वाचा - Chhaava Movie : 'छावा' पाहून लहानग्याला अश्रू अनावर; VIDEO पाहून तुमचाही ऊर भरुन येईल
काही दिवसांपूर्वी प्राजक्ता माळीने 12 ज्योतिर्लिंग यात्रा केल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आली होती. याचे फोटो तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world