'हलाल सर्टिफिकेट'ला हिंदू संघटनांकडून उत्तर, प्रसाद शुद्धीसाठी मिळणार ओम प्रमाणपत्र

मंदिराच्या बाहेर दिला जाणाऱ्या प्रसादाचे शुद्धीकरणासाठी हिंदू संघटनांकडून ओम प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
नाशिक:

प्रांजल कुलकर्णी, प्रतिनिधी

इस्लाममध्ये हलाल प्रमाणपत्र ही हमी मानली जाते. एखादं प्रोडक्ट हे मुस्लीम धर्मासाठी योग्य आहे. त्यामध्ये कोणतीही बनावट नाही. त्याचबरोबर इस्लाममध्ये हराम मानल्या गेलेल्या कोणत्याही प्राणी किंवा त्याच्या उपपदार्थाचा त्यात वापर  करण्यात आलेला नाही, याचं हे प्रमाणपत्र खात्री समजले जाते. अनेक मुस्लीम देशांमध्ये हलाल प्रमाणपत्र ही सामान्य गोष्ट आहे. भारतामध्येही अनेक प्रॉडक्ट्सना आता हे प्रमाणपत्र दिलेलं आढळतं. या हलाल प्रमाणपत्राला उत्तर देण्यासाठी हिंदू संघटनांकडून ओम प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात या अभियानाला सुरुवात झाली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कुणी घेतला पुढाकार?

ओम प्रतिष्ठानच्या वतीनं हे अभियान सुरु करण्यात आले आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये शुक्रवारी (14 जून) झालेल्या कार्यक्रमात या प्रमाणपत्राचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला ओम प्रतिष्ठानचे प्रमुख रणजीत सावरकर, अभिनेते शरद पोंक्षे तसंच अनेक साधू आणि महंत उपस्थित होते. 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे पणतू आणि ओम प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित सावरकर यांच्या हस्ते 'ओम प्रमाणपत्रा'चं अनावरण करण्यात आलं. महादेवाच्या पिंडीवर प्रमाणपत्र ठेवल्यानंतर मंदिराबाहेरच्या प्रसाद विक्रेत्यांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आले. या अभियानाच्या पहिल्या दिवशी 15 प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय.

नक्की वाचा - देशात हिंदूच्या लोकसंख्येत घट, मुसलमानांची लोकसंख्या 43 टक्के वाढली
 

काय आहे उद्देश?

हलालला ओमचा झटका द्यायचा आहे.. शास्र सांगितले आहे त्यानुसार पूजा सामुग्री आणि प्रसाद शुद्ध असावा. वेळोवेळी धर्मशास्राला भ्रष्ट करण्याचा प्रयत्न होत होता हिंदूंच्या भावना दुखावल्या जाऊ नये, प्रसाद शुद्धीकरण हा मुख्य हेतू आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये या अभियानाची सुरुवात झाली आहे, संपूर्ण देशभर हे कार्य करणार आहे, असं महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी सांगितलं.

Advertisement

पेढा शुद्ध दुधाचा असावा गाईच्या चरबीचा नसावा. हिंदूंची श्रद्धा दुखावू नये अशी आमची भावना आहे हलालला मान्यता आहे का? मग, ओम ला कशाला परवानगी हवी? आम्हाला श्रद्धा जपण्याचा अधिकार नाही का? आमच्या ओमला कुठलंही चॅलेंज नाही सर्टिफिकेटची गरज नाही, असं सावरकर यांनी सांगितलं. 

अभिनेते शरद पोंक्षे यांनी या उपक्रमाचं स्वागत केलंय. हिंदू धर्माच्या विरोधात जे काम चालतं त्याला आळा बसेल. त्र्यंबकेश्वरचे लोण हळूहळू पसरेल, हिंदू धर्म जागे होण्याचं प्रत्येक मंदिराच्या बाहेर होईल, असं पोंक्षे यांनी सांगितलं.  तर, हे प्रमाणपत्र देणारे तुम्ही कोण? हे काम अन्न पुरवठा खात्याकडं आहे, अशी टिका अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष अविनाश पाटील यांनी केलीय. 

Advertisement

 नक्की वाचा - PM मोदींना उगाच नाही AJIT DOVAL यांच्यावर विश्वास! भारताच्या जेम्स बाँडला घाबरतात पाकिस्तान-चीन 
 

हलाल सर्टिफिकेट म्हणजे काय?

इस्लाममध्ये हलाल प्रमाणपत्र ही हमी मानली जाते. त्यात कोणतीही भेसळ नाही आणि इस्लाममध्ये हराम मानल्या गेलेल्या कोणत्याही प्राणी किंवा त्याच्या उपपदार्थाचा त्यात वापर  करण्यात आलेला नाही, याची हे प्रमाणपत्र खात्री देते. हलाल प्रमाणपत्र हे शाकाहारी आणि मांसाहारी उत्पादनांसाठी असते मुस्लीम लोकसंख्या अधिक असलेल्या अनेक देशांमध्ये संबंधित कंपनीला खाद्यपदार्थांची विक्री करायची असल्यास 'हलाल प्रमाणपत्र' बंधनकारक असतं भारतात काही खासगी कंपन्यांकडून हलाल प्रमाणपत्र दिलं जातं. यामध्ये हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जमियत उलेमा-ए-हिंद आणि जमियत उलेमा- ए-हिंद हलाल ट्रस्ट यांचा समावेश आहे.

कधी दिलं जाईल ओम प्रमाणपत्र?

मंदिराच्या बाहेर दिला जाणाऱ्या प्रसादाचे शुद्धीकरण व्हावे यासाठी ओम प्रतिष्ठानच्या वतीनं विक्रेत्यांना हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र ऐच्छिक असून देशभरात मोहीम सुरू करण्यात येईल. पेढा शुद्ध दुधाचा असावा. गायीच्या चरबीचा नसावा. हिंदूंच्या भावना दुखावू नये, हा आमचा उद्देश आहे. ओम प्रमाणपत्रला मंदिर महासंघाची मान्यता आहे. संपूर्ण तपासणी करुन हे प्रमाणपत्र दिले जाईल. क्यू आर कोड तपासल्यानंतर संपूर्ण माहिती मिळेल, अशी माहिती ओम प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित सावरकर यांनी दिली. 
 

Advertisement