Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप! दोन कट्टर वैरी एकत्र; विधानपरिषदेचं गणित बदललं

अनिल बोंडे यांच्या मध्यस्थीनंतर या दोन्ही नेत्यांनी एकत्र येत विजयाचा विश्वास व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीत प्रवीण पोटे हे उमेदवार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins

शुभम बायस्कार, अमरावती:

Amravati Politics:  अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत एक अत्यंत धक्कादायक आणि मोठा राजकीय भूकंप झाला आहे.. एकमेकांवर जहरी टीका करणारे आणि ज्यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे, ते माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील आणि आमदार रवी राणा अखेर एकत्र आले आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही बड्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू झाली असून, दोघांमधील वैर आता अधिकृतपणे संपुष्टात आल्याच दिसत आहे.

Bhiwandi News: तुकाराम मुंढेंच्या खांद्यावर बंदूक, महिलेने केली लाखोंची वसूली, एक चूक नडली अन् खेळ खल्लास

कट्टर राजकीय विरोध एकत्र, अमरावतीत नवा राजकीय धमाका

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कट्टर राजकीय वैरी असलेले अमरावतीतील माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील आणि आमदार रवी राणा यांची बैठक अखेर संपली आहे. खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या मध्यस्थीनंतर या दोन्ही नेत्यांनी एकत्र येत विजयाचा विश्वास व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीत प्रवीण पोटे हे उमेदवार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.

Advertisement

 विशेष म्हणजे, या दोन कट्टर नेत्यांमधील वाद मिटवून त्यांना एकत्र आणण्यात भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी 'संकटमोचक' म्हणून मोठी मध्यस्थी केली आहे. या नव्या समीकरणामुळे अमरावती जिल्ह्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे  बदलण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना प्रवीण पोटे म्हणाले की, "आमच्यात कधीही कोणतेही गैरसमज नव्हते आणि पुढेही राहणार नाहीत. महायुतीचा प्रत्येक घटक आमच्या सोबत आहे."

तर, आमदार रवी राणा यांनी पोटे यांना जाहीर पाठिंबा देत स्पष्ट केले की, "प्रवीण पोटे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा आदेश असून, त्यांच्या नेतृत्वाखाली प्रवीण पोटे हे या निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून येतील!" या दिलजमाईमुळे अमरावतीत आता भाजप महायुतीचे पारडे कमालीचे जड झाले आहे.

नक्की वाचा - Pune News: लोणावळा परिसरात भीती, चिंता अन् धाकधूक! मान्सून आधी मळवली- देवलेवासीय का घाबरले?