'...तर गोदावरी नदीमध्ये जलसामधी' बीड जिल्ह्यातल्या ठेवीदारांचा गंभीर इशारा

Advertisement
Read Time: 2 mins
बीड:

स्वानंद पाटील, प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मल्टीस्टेटमध्ये अडकलेले पैसे ठेवीदारांना तात्काळ परत केले जावे यासाठी आज (शुक्रवार 5 जुलै) ठेवीदार आणि खातेदार संघर्ष समितीनं हलगी बजाओ आंदोलन केलं. बीड जिल्ह्यातल्या गेवराई हे आंदोलन झालं. या प्रकरणात 19 तारखेपर्यंत कारवाई न झाल्यास थेट गोदावरीच्या पात्रात जलसामधी घेण्यात येईल असा इशारा या आंदोलकांनी प्रशासनाला दिला.  

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गेवराई पोलीस स्टेशनपर्यंत रॅली काढत, हालगी वाजवत हे आंदोलन केले गेले आहे. यामधे बहुतांश खातेदार शेतकरी होते. या शेतकऱ्यांना आपल्याच कष्टाच्या पैशासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

बीड जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टीस्टेट,साईराम मल्टीस्टेट,राजस्थानी मल्टीस्टेट,जिजाऊ मल्टीस्टेट,लक्ष्मी माता अर्बन आणि मराठवाडा अर्बन या मल्टीस्टेटमध्ये हजारो ठेवीदारांनी आपल्या ठेवी ठेवल्या होत्या.परंतु गेल्या सहा महिन्यांपासून या सर्व मल्टीस्टेटल कुलूप लागले आहे.त्यामुळे कोट्यावधी रुपयांच्या ठेवी यात अडकून पडल्या आहेत. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून ठेवीदारांनी त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे.

'ठेवीदारांना ,खातेदारांना बिना माय बापाच्या लेकरांसारख या त्या कार्यालयात फिरण्याची वेळ आली आहे. कुणाचे शिक्षण,तर कुणाचे लग्न, दवाखाने पैसे नसल्याने बाकी आहेत मात्र यांना कोणी वालीच नसल्याचे दिसून येतंय. या सर्व मल्टीस्टेटच्या संचालकांना वाचवण्याचे काम प्रशासन करीत आहे. 

( नक्की वाचा : पंकजा मुंडे विधानपरिषदेवर, भाजपाकडून 5 जणांना उमेदवारी जाहीर )
 

ठेवीदारांनी आत्महत्या केल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का? 19 जुलैपर्यंत  मल्टीस्टेट प्रकरणातील आरोपींना अटक झाली नाही, त्यांची मालमत्ता जप्त झाली नाही तर थेट गोदावरीच्या पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात येईल,' असा इशारा या आंदोलकांच्या नेत्या पूजा मोरे यांनी दिला.  
 

Advertisement
Topics mentioned in this article