जाहिरात

Maval Accident: शिवज्योत घेऊन धावताना भयंकर घडलं; मावळमधील 2 शिवभक्तांचा मृत्यू; हृदयद्रावक घटना!

जल्लोषात साजरी होणारी शिवजयंती या घटनेमुळे दुःखात बुडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Maval Accident: शिवज्योत घेऊन धावताना भयंकर घडलं; मावळमधील 2  शिवभक्तांचा मृत्यू; हृदयद्रावक घटना!

सुरज कसबे, पुणे:

Shivjayanti 2026 Maval Accident News:  आज (शुक्रवार, 6 मार्च) राज्यभरात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. राज्यभरात शिवजयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम, मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले असून शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच मावळमध्ये शिवजयंतीच्याच दिवशी दोन शिवभक्तांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

शिवजयंतीला काळाचा घाला, दोघांचा मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार, किल्ले विसापूरवरून शिवज्योत घेऊन उत्साहाने गावाकडे निघालेल्या दोन शिवभक्तांवर काळाने घाला घातला आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर नायगाव फाट्याजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात शिंदेवाडी येथील दोन तरुण शिवभक्तांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण आंदर मावळ परिसरात शिवजयंतीच्या दिवशी शोककळा पसरली आहे. ओंकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे अशी अपघातात मृत्यू झालेल्या शिवभक्तांची नावे आहेत.

Jishnu Dev Varma: कोण आहेत जिष्णू देव वर्मा? महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून झाली नियुक्ती

 शिंदेवाडी येथील शिवभक्त किल्ले विसापूर येथून शिवज्योत घेऊन मोठ्या उत्साहात गावाकडे निघाले होते. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हे तरुण जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील नायगाव जवळ पोहोचले. त्याच वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका कारने अत्यंत बेदरकारपणे दुभाजक ओलांडून धावणाऱ्या शिवभक्तांना भीषण धडक दिली.

ही धडक इतकी जोरदार होती की, ओंकार आणि दर्शन या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. शिवरायांच्या जयंतीनिमित्त गावात मोठ्या स्वागताची तयारी सुरू असतानाच, ही हृदयद्रावक बातमी धडकल्याने शिंदेवाडी गावावर शोककळा पसरली. जल्लोषात साजरी होणारी शिवजयंती या घटनेमुळे दुःखात बुडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

अकोल्यात भीषण अपघात! 

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात दहिगाव फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण चार जण जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. जखमींमध्ये नेर येथील वडील आणि मुलगा यांचा समावेश असून दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. तसेच बाळापूर येथील एका महिलेचाही या अपघातात समावेश आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. 

Navi Mumbai: नवी मुंबईमध्ये भर वर्गात कोसळला स्लॅब; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चिमुरड्याचा मृत्यू

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com