जाहिरात

T20 Special Train: फायनलसाठी सुसाट अहमदाबादला जा, मध्य रेल्वेकडून स्पेशल ट्रेन; पाहा वेळापत्रक

क्रिकेटप्रेमींची अहमदाबादकडे होणारी वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने पुणे आणि अहमदाबाद दरम्यान विशेष शुल्कासह सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

T20 Special Train: फायनलसाठी सुसाट अहमदाबादला जा, मध्य रेल्वेकडून स्पेशल ट्रेन; पाहा वेळापत्रक

यशपाल सोनकांबळे, पुणे: 

T20 World Cup Special Train:  रविवारी टी ट्वेंटी विश्वचषकाचा अंतिम थरार अहमदाबादमध्ये रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्याविरोधात होणाऱ्या या  सामन्याचा उत्साह शिगेला पोहोचला असून क्रिकेटप्रेमींची मोठी गर्दी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाहायला मिळणार आहे. क्रिकेटप्रेमींची अहमदाबादकडे होणारी वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने पुणे आणि अहमदाबाद दरम्यान विशेष शुल्कासह सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्यासाठी जाणाऱ्या प्रेक्षकांना प्रवासाचा सुलभ पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे नियोजन करण्यात आले आहे.

फायनलसाठी सुसाट अहमदाबादला जा..! (Pune- Ahmedabad Train Timetable)

टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याचा उत्साह शिगेला पोहोचला असून, क्रिकेटप्रेमींची अहमदाबादकडे होणारी वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने पुणे आणि अहमदाबाद दरम्यान विशेष शुल्कासह सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्यासाठी जाणाऱ्या प्रेक्षकांना प्रवासाचा सुलभ पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे नियोजन करण्यात आले आहे.

IND Vs ENG: कॅप्टन सूर्याचा 'गंभीर' प्लॅन, इंग्लंडचा पराभव तिथेच ठरला! काय होता सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक?

​गाडीचे वेळापत्रक आणि मार्ग:
ट्रेन क्रमांक ०१४१७ पुणे-अहमदाबाद सुपरफास्ट स्पेशल शनिवारी, ७ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजता पुण्याहून रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५:३० वाजता अहमदाबादला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी, ट्रेन क्रमांक ०१४१८ अहमदाबाद-पुणे सुपरफास्ट स्पेशल सोमवार, ९ मार्च रोजी पहाटे २:०० वाजता अहमदाबादहून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी १२:१० वाजता पुणे स्थानकावर दाखल होईल.

कुठे कुठे थांबणार गाडी? 

या विशेष गाडीला प्रवासादरम्यान लोणावळा, कल्याण, कमान रोड, वसई रोड, सुरत आणि वडोदरा या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. ही गाडी २२ आयसीएफ (ICF) कोचची असून यामध्ये १ एसी-२ टियर, ५ एसी-३ टियर, १० स्लीपर क्लास, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ गार्ड/लगेज व्हॅनचा समावेश आहे. या गाड्यांचे आरक्षण विशेष शुल्कासह उपलब्ध असून, प्रवाशांनी अधिकृत संकेतस्थळावरून तिकीट नोंदणी करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

IND vs ENG: बाउंड्रीवर थांबला अन् काहीतरी पुटपुटला; इंग्लंडविरुद्धच्या महायुद्धापूर्वी गंभीरचा तो अवतार कैद

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
T20 World Cup Final २०२६, Pune-Ahmedabad Superfast Special Train
Listen to the latest songs, only on JioSaavn.com