Pune Airport News: मोठी बातमी! पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात; धावपट्टी बंद

पुण्यात येणारी किमान आठ विमाने विविध शहरांकडे वळवण्यात आली आहेत. सुदैवाने, या घटनेत विमानातील कर्मचारी सुरक्षित असून नागरी मालमत्तेचे कोणतेही नुकसान झालेले नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:

Pune Airport IAF Aircraft Incident:  लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी रात्री भारतीय हवाई दलाच्या (IAF) एका विमानाला तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे विमानतळाची धावपट्टी सुरक्षिततेच्या कारणास्तव तात्पुरती बंद करण्यात आली असून, पुण्यात येणारी किमान आठ विमाने विविध शहरांकडे वळवण्यात आली आहेत. सुदैवाने, या घटनेत विमानातील कर्मचारी सुरक्षित असून नागरी मालमत्तेचे कोणतेही नुकसान झालेले नाही.

Kalyan News: कल्याणमध्ये 3 हजार लिटर गावठी दारू जप्त, 2 आरोपींना अटक, कुठे आणि कसा रचला सापळा?

हवाई दलाचे विमान अडकले

समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे विमानतळावर रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हवाई दलाच्या लढाऊ विमानाचा अपघात झाला. विमानाचे लँडिग होत असतानाच लँडिग गिअर निकामे झाले, ज्यामुळे विमान धावपट्टीवर अडकले. या दुर्घटनेमुळे धावपट्टीवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ​हवाई दलाच्या मीडिया को-ऑर्डिनेशन सेंटरने रात्री ११:४१ च्या सुमारास 'X' (पूर्वीचे ट्विटर) वरून या संदर्भात माहिती दिली.

Advertisement

धावपट्टीवर विमान अडकल्याने किंवा तांत्रिक बिघाडामुळे ती वापरासाठी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. "पुणे धावपट्टी सध्या तांत्रिक कारणामुळे बंद आहे. सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. धावपट्टी लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत," असे हवाई दलाने स्पष्ट केले.

​फ्लॅट ट्रॅकिंग डेटाच्या माहितीनुसार, पुण्याकडे येणाऱ्या विमानांना सुरत, गोवा (मनोहर विमानतळ), नवी मुंबई, चेन्नई आणि कोईम्बतूर येथे वळवण्यात आले. अचानक झालेल्या या बदलामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विमानतळ प्रशासनाने धावपट्टी लवकरात लवकर रिकामी करून कामकाज पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे.

नक्की वाचा >> Dombivli News: डोंबिवलीत गुंडगिरी, केडीएमसी अधिकाऱ्यांना बांबूने मारलं, पेंढारकर कॉलेज परिसरात काय घडलं?