Dombivli Viral Video: डोंबिवली शहरातील पेंढारकर कॉलेज परिसरात फेरीवाल्यांची गुंडगिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. केडीएमसीच्या अधिकाऱ्यावर थेट हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अतिक्रमणाविरोधात कारवाई करत असताना एका सँडविच विक्रेत्याने अधिकाऱ्यावर बांबूने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत केडीएमसीचे अधिकारी सुरेश कामराज जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या मारहाणीचा व्हिडिओही समोर आला असून शहरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,पेंढारकर कॉलेज परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी केडीएमसीचे पथक पोहोचले होते.यावेळी कारवाईला विरोध करत संबंधित सँडविच विक्रेत्याने आक्रमक भूमिका घेतली आणि थेट अधिकाऱ्यावर हल्ला चढवला.बांबूने मारहाण केल्याने कामराज गंभीर जखमी झाले.
नक्की वाचा >> Kalyan News: "सत्ता पैसा गुंडगिरी...", कल्याणमध्ये वरुण सरदेसाईंचा शिंदे गटाला इशारा, "मधूर म्हात्रे बेईमान.."
फेरीवाल्यांच्या वाढत्या दादागिरीला कोण रोखणार?
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.नागरिकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला असून फेरीवाल्यांच्या वाढत्या दादागिरीवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
नक्की वाचा >> Dhule News: वृद्धाची एन्ट्री, हात हवेत, एकटीच चालत गेली! 18 वर्षाच्या तरुणीच्या अपहरणाचं चक्रावून टाकणारं CCTV
शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.अभिनव गोयल आणि संबंधित विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी फेरीवाला विरोधात विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे.या कारवाईला विरोध झाल्याने या फेरीवाला विरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world