Pune Bhondu Baba : भाविकांच्या मोबाइलद्वारे हॅक करणाऱ्या भोंदूबाबाचं मुंबई-ठाणे कनेक्शन आलं समोर

मठात येणाऱ्या भक्तांच्या मोबाईलमध्ये एअर ड्राइड किड्स हे हिडन अॅप टाकून, त्यांच्या खासगी क्षणांवर नजर ठेवणारा, भोंदूबाबा, प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pimpri Chinchwad News : मठात येणाऱ्या भक्तांच्या मोबाईलमध्ये एअर ड्राइड किड्स हे हिडन अॅप टाकून, त्यांच्या खासगी क्षणांवर नजर ठेवणारा, भोंदूबाबा (Pune Bhondu Baba) प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. मात्र अटकेच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्याकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या भोदू बाबाचं मुंबई-ठाणे कनेक्शन समोर आलं आहे. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती अधिक असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

कोणत्याही परिस्थितीत आरोपी भोंदूबाबा तामदार याला जामीन देऊ नये अशी विनंती करत या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी असल्याचं सांगत, हे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या पहिल्या फिर्यादीने NDTV मराठीवर या भोंदू बाबाच्या काळ्या कारनाम्याची कुंडलीच वाचलीये. नेमका हा भोंदू बाबा तरुण तरुणींना कसा फसवायचा? त्याचं शोषण कसं करायचा? आणि त्यांच्याकडून नको त्या गोष्टी कसा करून घ्यायचा हे देखील या फिर्यादीने सांगत भोंदू बाबाकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय. 

Advertisement

नक्की वाचा - 300 जणांची गर्दी, रात्री 1 वा. पंचायत अन् मृत्यूची घोषणा; चेटकीणीच्या संशयातून कुटुंबातील 5 जणांना जिवंत जाळलं

ज्या कलमांखाली भोंदू बाबा प्रसाद तामदार याला अटक करण्यात आली. त्यामध्ये खंडणी उकळणे आणि अल्पवयीनं भक्तांचे शोषण करणे यासाठी पॉक्सो कायदा अंतर्गत गुन्हे दाखल होणे गरजेचे होते. मात्र ते झाले नसल्याची धक्कादायक माहिती या प्रकरणातील फिर्यादीच्या वकिलांनी समोर आणली आहे. तर याहून धक्कादायक बाब म्हणजे भोंदूबाबाने ठाणे आणि मुंबई परिसरात देखील एका महिलेच्या माध्यमांतून आपल्या काळ्या कृत्याचा बाजार मांडला असल्याची नवी माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्यायालयाने भोंदू प्रसाद तामदारला जामीन देऊ नये यासाठी विनंती करणारा असल्याच देखील वकिलांनी म्हटले आहे.

Advertisement

Topics mentioned in this article