Pune News: 'लेकीला न्याय मिळेपर्यंत...' नसरापूर पिडितेच्या पित्याचा मोठा निर्णय; राजकीय नेत्यांवर संताप

ज्या व्यक्तीने हे कृत्य केले त्याला फाशी मिळाली पाहिजे, लवकर फाशी झाली पाहिजे अशी मागणी कुटूंबियांची आहे, असं त्यांनी सांगितले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

अजिंक्य धायगुडे पाटील पुणे:

Pune Bhor Minor Girl Rape Case:  पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यामधील नसरापूर येथे अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या भयंकर घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणानंतर  संतप्त प्रतिक्रिया उमटत असून पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. या घटनेनंतर अनेक राजकीय संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. अशातच पीडित चिमुकलीच्या वडिलांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

Delhi Fire: राजधानीत अग्नितांडव! एसीने केला घात, झोपेतच 9 जणांचा कोळसा, मृतदेहांची भयंकर अवस्था

पिडीत मुलीच्या वडिलांचा मोठा निर्णय 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नसरापूर येथील अत्याचार आणि हत्या प्रकरणाने राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेनंतर अनेक राजकीय नेते पिडितेच्या कुटुंबियांची भेट घेत धीर देत आहेत. अशातच आता पिडीत चिमुकलीच्या वडिलांनी कोणत्याही राजकीय नेत्याला न भेटण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत राजकीय व्यक्तींनी आमच्या कुटुंबाला भेटायला येऊ नये" असं पिडितेच्या वडिलांनी म्हटले आहे. 

Advertisement

राजकीय पुढारी भेटायला येतात, फोटो काढतात, स्वतःच राजकारण साध्य करतात, मात्र माझ्या मुलीला न्याय मिळणे महत्त्वाचे आहे.  असं म्हणत मुलीला न्याय मिळेपर्यंत कोणत्याही नेत्याला भेटणार नाही, असं मुलीच्या वडिलांनी म्हटलं आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. ज्या व्यक्तीने हे कृत्य केले त्याला फाशी मिळाली पाहिजे, लवकर फाशी झाली पाहिजे अशी मागणी कुटूंबियांची आहे, असं त्यांनी सांगितले. 

राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल 

पुणे जिल्ह्यातील नसरापूर गावातून एक अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अवघ्या ३ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.   या प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी घेतली असून, आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नक्की वाचा - Weather News: मे महिन्यात उष्णतेचा तडाखा कमी होणार, पण 'ही' गोष्ट टेन्शन वाढवणार, कसं असेल मेचं तापमान?

Topics mentioned in this article