Pune Crime: 'माझं आयुष्य मी खराब केलं', रियाचा जप, गुढ चिठ्ठी.. अल्पवयीन मुलगी बेपत्ता, सस्पेन्स वाढला

16 वर्षाची अल्पवयीन मुलगी कॉलेजला जाते असं सागून घरातून बाहेर पडली अन् बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. तिच्या बॅगमध्ये सापडलेल्या चिठ्ठीतून एक खळबळजनक खुलासाही झाला आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins

अविनाश पवार, पुणे:

Manchar Minor Girl Missing Case:  राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यवतमाळ मधल्या राळेगावातून ३५ मुली गायब झाल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच आता मंचर परिसरातही अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. मंचरमध्ये एक 16 वर्षाची अल्पवयीन मुलगी कॉलेजला जाते असं सागून घरातून बाहेर पडली अन् बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. तिच्या बॅगमध्ये सापडलेल्या चिठ्ठीतून एक खळबळजनक खुलासाही झाला आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  मंचरमधील गाडेकर कुटुंबातील अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाली असून, तिला आमिष दाखवून पळवून नेण्यात आल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. प्राथमिक माहितीनुसार, रिया सिंग नावाची महिला, जी सध्या हैदराबाद येथे राहत असल्याचे सांगितले जात आहे, हिने संबंधित मुलीशी संपर्क साधून तिला फूस लावली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

Advertisement

या प्रकरणी मंचर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपीचा मोबाईल ट्रेस केल्यानंतर तिचे लोकेशन बिहार आणि उत्तर प्रदेश या भागात आढळल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप मुलीचा ठावठिकाणा लागलेला नाही.  मुलगी बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण असून विशेषतः आईची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळी झाडणारा कोण? ओळख समोर येताच सर्वच जण हादरले, मास्टर प्लॅन ही उघड

आईने काय सांगितलं?

"माझी मुलगी इन्टाग्रामवर रिया सिंग नावाच्या मुलीशी बोलत होती. आम्हाला सुरुवातीला मुलासोबत बोलत असेल असे वाटले, मात्र ती एका मुलीशी बोलत असल्याचे निदर्शनास आले. मी तिला माझ्या मुलीशी बोलू नको म्हणून तंबीही दिली होती, मात्र त्यांचा संवाद सुरु होता.  ती मंचरमधील समाधान लॉजवर राहायची अन् माझ्या मुलीला भेटायलाही यायची. मी तिला पाहिलं होते. 

20 एप्रिलला कॉलेजला जाते असं सांगून माझी मुलगी घराबाहेर पडली ती परत आलीच नाही. ती माझ्या मुलीला घेऊन गेली. ७ दिवस झाले मुलगी जाऊन तिचे काय झाले असेल? तिच्या कपड्यांमध्ये एक चिठ्ठीही सापडली ज्यामध्ये तिने रियाकडे जात असल्याचा उल्लेखही केला आहे.  मला रियाशिवाय करमत नाही. माझे आई वडील मला रियाशी भेटू देत नाहीत, मला सुखाने जगू देत नाही. देतात. मला रियाकडे जायचं आहे. मी माझ्या हाताने माझं आयुष्य बरबाद केलं आहे. मी इथून गेल्यानंतर माझं आयुष्य उध्वस्त होणार आहे, काय होईल मला माहित नाही. असं या मुलीने चिठ्ठीमध्ये लिहलं आहे. 

दरम्यान,  “माझ्या मुलीला सुरक्षित परत आणा,” अशी आर्त विनंती आईने प्रशासनाकडे केली आहे. स्थानिक नागरिकांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी तत्काळ कारवाई करून मुलीचा शोध घ्यावा, अशी मागणी केली आहे. घटनेमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांमध्येही चिंता वाढली आहे.

नक्की वाचा - Trending News: 'कैसे हराया', बोलणाऱ्या सहर शेख आता मराठी बोलणार? मनसेची भन्नाट आयडीया, सर्वांच आवाक