जाहिरात

Trending News: 'कैसे हराया', बोलणाऱ्या सहर शेख आता मराठी बोलणार? मनसेची भन्नाट आयडीया, सर्वांच आवाक

मनसेच्या या इशाऱ्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Trending News: 'कैसे हराया', बोलणाऱ्या सहर शेख आता मराठी बोलणार? मनसेची भन्नाट आयडीया, सर्वांच आवाक
  • एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख पुन्हा एका भाषिक वादात सापडल्या असून त्यांनी मराठीत उत्तर देण्यास नकार दिला आहे
  • सहर शेख यांनी पत्रकार परिषदेत मराठी प्रश्नांची उत्तरे हिंदीत दिली
  • महाराष्ट्रात मराठी भाषा सर्वसामान्यांनी बोलणे अनिवार्य असल्याने लोकप्रतिनिधींसाठीही मराठी बोलणे आवश्यक आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
अहिल्यानगर:

प्रसाद शिंदे 

एमआयएमच्या मुंब्रा इथल्या नगरसेविका सहर शेख या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्द तापला असताना आता त्या भाषेवरून वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. महापालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सहर शेख यांचा कैसे हराया हा डायलॉग वाऱ्या सारखा व्हायरल झाला होता. त्यानंतर त्या ठाणे महापालिकेतच नाही तर संपूर्ण राज्यात परिचित झाल्या. त्यानंतर त्या खोट्या जात प्रमाणपत्र प्रकरणी प्रकाश झोतात आल्या होत्या. सध्या त्या मराठी न बोलल्यामुळे वादात सापडल्या आहेत. मराठी न बोलल्या मुळे त्यांनी जणू नव्या वादाला तोंड फोडले आहे. 
   
नगरसेविका असलेल्या सहर शेख या अहिल्यानगरच्या दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी मराठीत प्रश्न विचारले. पण त्यांना मराठीत उत्तर देता आले नाही. त्यांनी मराठीत उत्तर देण्यास नकार दिला. त्यांनी आपले उत्तर हे हिंदीत दिले. ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खटकली आहे. महाराष्ट्रात मराठीसाठी आग्रह धरला जात आहे. मराठी ही प्रत्येकाने बोललीच पाहीजे. मुंबईत ही सध्या रिक्षा टॅक्सा चालकांना मराठी सक्तीची केली आहे. असं असताना सहर शेख तर लोकप्रतिनिधी आहेत. अशा वेळा त्यांनी मराठीत बोललं पाहीजे अशी भूमीका मनसेची आहे. 

नक्की वाचा - Shocking news: डोळ्यादेखत 10 घरं जमिनीने गिळली, गाड्या ही गायब, 'या' गावात भयंकर तांडव

या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या अहिल्यानगरच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना युवती जिल्हाध्यक्ष श्रद्धा खोंडे यांनी एक भन्नाट आयडीया केली आहे. त्यांनी कुरिअरच्या माध्यमातून सहर शेख यांना मराठी भाषा यावी यासाठी मराठी बाराखडी आणि अंकलीपीची पुस्तके पाठवले आहेत. एक महिन्यांमध्ये हिंदी मराठी भाषा शिकावी व पुढच्या पत्रकार परिषदेत मराठीत बोलावे असं श्रद्धा खोंडे यांनी सांगितलं. तस झालं नाही. तर मनसे त्यांना मुंबईत येऊन मराठी भाषा शिकवेल असा असा इशारा त्यांनी दिला आहे. मनसेच्या या इशाऱ्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

नक्की वाचा - Trending News: पोलीसाच्या घरी चोर! साहेब झोपले होते, चोर आले अन् त्यांनी जे काही केले त्याची सगळीकडेच चर्चा

एका वादातून बाहेर येताच दुसरा वाद सहर शेख यांचा पिछा सोडताना दिसत नाही. मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर सहर शेख मराठी शिकणार का हा खरा प्रश्न आहे. शिवाय त्यांना पाठवलेली अंकलिपी खरोखर त्यांच्या पत्त्यावर जाणार की हा फक्त मनसेचा स्टंट ठरणार याची ही चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. त्यामुळे पुढचा एक महिन्यात काय घडामोडी होतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. सहर शेख या एमआयएमच्या ठाणे महापालिकेत नगरसेविका आहेत. त्या त्यांच्या कैसे हराया या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर राज्यभर फेमस झाल्या होत्या. 

Latest and Breaking News on NDTV
Listen to the latest songs, only on JioSaavn.com