Pune Dam Water Level: पुणे शहरावर मान्सून मेहरबान! धरणांचा पाणीसाठा वाढला; कोणते धरण किती भरले?

Pune Rain Khadakwasla dam chain Water Storage: दोनच महिन्यात शहरात वर्षाच्या 70 ते 80 टक्के सरासरी इतका पाऊस झाला आहे. यंदा मान्सून 26 मे रोजी दाखल झाला.याआधी 5 जूनपर्यंत मान्सून आल्याचे तपशील उपलब्ध आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Rain Dam Water Storage:  राज्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली असून पुणे शहरावर वरुणराजाची कृपा पाहायला मिळत आहे. पुणे शहरामध्ये गेल्या दोन महिन्यामध्ये 511 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुण्यासह धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. पुण्याजवळील चारही धरणांमध्ये  तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. 

पुणे शहरावर मान्सून मेहरबान!

यंदाचा मान्सून पुणे शहरावर मेहरबान झाला असून शहरामध्ये गेल्या दोन महिन्यामध्ये 511 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील दोन महिन्यात 511 मिलिमीटर पावसाची नोंद शहराची वार्षिक सरासरी 700 ते 750 इतके आहे. मात्र दोनच महिन्यात शहरात वर्षाच्या 70 ते 80 टक्के सरासरी इतका पाऊस झाला आहे. यंदा मान्सून 26 मे रोजी दाखल झाला.याआधी 5 जूनपर्यंत मान्सून आल्याचे तपशील उपलब्ध आहेत. 

त्याआधी मे मध्ये शहरात तुफान पाऊस झाला. त्यामुळे शहरातील उन्हाळा लवकर संपला आणि जमिनीची धूप कमी होऊन पावसाने जमीन ओली झाली यंदा 17 ते 27 मे या दहा दिवसांत तब्बल 270 मि.मी. पाऊस झाला.गत 50 वषार्ंतील हा विक्रमी पाऊस ठरला. तर 23 जूनपर्यंत शहराची जूनची सरासरी ही 241 मि.मी. इतकी भरली आहे.

दुसरीकडे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरण परिसरात सुरुवातीच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणीसाठा चांगला वाढला आहे. खडकवासला धरण साखळीत 13.16  टीएमसी पाणीसाठा असून खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये एकूण 13.16 टीएमसी म्हणजे 45.13 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.  गतवर्षी याच दिवशी साठा फक्त 3.57 टीएमसी म्हणजे 12.24 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. म्हणजेच यंदा धरणांमध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. 

Advertisement

कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

खडकवासला 1.23 टीएमसी
पानशेत 4.41  टीएमसी
वरसगाव 6.40 टीएमसी 
टेमघर 1.11 टीएमसी

दरम्यान,  "पुण्यातील पावसामुळे रस्त्यावर पाणी तुंबू नये यासाठी नवा आराखडा तयार करा" असे आदेश पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत.  शहराच्या जुन्या हद्दीसाठी नवा एकात्मिक पावसाळी पाणी व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आदेश दिले असून "शहरात थोडा पाऊस झाल्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचत त्यासाठी प्रस्ताव द्या, असं त्यांनी म्हटले आहे.  शहरातील मेट्रो रस्त्याचे काम उड्डाणपुलाचे काम यामुळे या गटारीतून सुद्धा पाण्याचा निचरा होत नसल्याने नवीन आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.