Banana Farmer News: मनात मृत्यूची भिती, डोळ्यात अश्रू; केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात! घडतंय काय?

बाजारात माल पोहोचवण्याचा खर्च वजा झाला की, हा तोटा शेतकऱ्यांच्या अंगावरच येतो. त्यातच या भागात बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात जाणेही कठीण झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अविनाश पवार, पुणे:

Pune Farmer News: उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात पिंपरी दुमाला येथील शेतकरी बबन चिखले यांच्या कुटुंबावर केळीच्या कोसळलेल्या बाजारभावाने अक्षरशः संकट कोसळले आहे. केळीचे भाव दिवसेंदिवस पडत चालल्याने चिखले कुटुंब आर्थिकदृष्ट्या कोलमडले असून, त्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू उभे राहिले आहेत. एकीकडे बिबट्याच्या दहशतीने जीव मुठीत घेऊन शेती करायची त्यात भावही मिळत नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. 

खर्च दीड लाख, उत्पन्न 64,000

 दादाभाऊ चिखले यांनी दोन एकरांमध्ये केळीची लागवड केली. रोपे, खते, औषधे, मजुरी, पाण्याचा खर्च अशा सर्व गोष्टी धरता त्यांच्यावर तब्बल दीड ते पावणे दोन लाख रुपयांचे गुंतवणूक झाली. परंतु उत्पादन हाती येईपर्यंत बाजारभाव कोसळून अवघे ३–४ रुपये प्रति किलो एवढ्या तळाला गेले. सध्या बाजारात २० किलोच्या एका कॅरेटला फक्त ८० रुपये मिळत आहेत. व्यापारी अडवून दर पाडतात, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

Palghar News: झडप घातली, दप्तरामुळे वाचला जीव; पाचवीतल्या पोरांनी बिबट्याला पळवलं

साधारण ८०० कॅरेट तयार होतील असा चिखले यांना अंदाज आहे तरी त्यांना केवळ ६४,००० रुपये मिळणार आहेत. परंतु उत्पादनावरील खर्च दीड ते पावणे दोन लाख असल्याने त्यांच्या हातात काहीही शिल्लक राहत नाही. त्यातच बाजारात माल पोहोचवण्याचा खर्च वजा झाला की, हा तोटा शेतकऱ्यांच्या अंगावरच येतो. त्यातच या भागात बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात जाणेही कठीण झाले आहे.

बिबट्याची भिती, दरही मिळेना, बळीराजा हतबलं!

एकीकडे जीव मुठीत धरून शेती करायची, दुसरीकडे शेतमालाला भाव नाही अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकला आहे. शेतकरी असा मेटाकुटीला आलेलं असताना सत्ताधारी आणि विरोधक हे लोकशाहीतले दोन्ही घटक यावर फारसे गंभीर दिसत नाहीत. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य हमीभाव, बाजारव्यवस्थेत सुधारणा आणि व्यापाऱ्यांवरील नियंत्रण केव्हा येणार? असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

Dombivli News: 65 बेकायदा इमारत प्रकरणी मोठा ट्वीस्ट, कोर्टाने दिले आता 'हे' आदेश