Pune Ganpati Festival FDA Guildlines For Ganpati Mandal: गणेश उत्सव काळात नागरिकांना स्वच्छ, निर्भळ अन्न प्राप्त व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासन पुणे मार्फत उत्सव काळात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हयात 11 ऑगस्ट 2025 रोजी पासुन आजपर्यंत एकुण 35 अन्न आस्थापनेच्या तपासण्या करण्यात आल्या असुन अन्न आस्थापनेतून सणासुदीच्या काळात प्रसादासाठी लागणारे कच्चे अन्न पदार्थ व मिठाई यांचे एकुण 62 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे यांनी कळविले आहे.
गणेश मंडळांनी घ्यावयाची काळजी!
- सर्व गणेश मंडळांनी भाविकांसाठी तयार केलेला प्रसाद हा काचेच्या भांडयात किया पारदर्शक food grade प्लॅस्टीकच्या भांडयात झाकुन ठेवावे. जेणेकरून प्रसादाला धुळ, माती, माशा, मुग्या या इतर किटकांचा प्रादुर्भाव होणार नाही.
- भाविकांना शिळे अन्नपदार्थ सेवनास देऊ नयेत. प्रसाद हताळणाऱ्या सर्व व्यक्तीचे कपडे स्वच्छ असावेत. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीने साबणाने / हॅड वॉशने हात स्वच्छ धुवुनच कामास सुरूवात करावी.
- प्रसाद हाताळणाच्या व्यक्तीने नाक, कान, डोके व केस खाजवणे वा डोळे चोळणे टाळावेत. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीने शिंकने व थुकणे तंबाखु वा धुम्रपान करणे टाळावे. संसर्गजन्य आजार असणाऱ्या व्यक्तीने प्रसाद बनविणे व हाताळण्याची कामे करू नयेत.
- प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीची नखे व्यवस्थीत कापलेली असावीत व त्यात घाण साचलेली असु नये. गणेश मंडळानी आवश्यक तेवढाच ताजा प्रसाद विशेषत दुध व दुग्धजन्य अन्न पदार्था पासून तयार केलेला प्रसाद भक्ताना सेवनास देण्यात यावा व शिल्लक प्रसाद योग्य त्या तपमानास साठुन ठेवण्यात यावा.
- कच्च्या अन्न पदार्थाचा टाकाऊ कचरा आणि भक्तांना कचरा टाकण्यासाठी झाकण असलेली कचरा कुंडी ठेवावी जेणे करून आजुबाजुचा परीसर स्वच्छ राहील. प्रसाद तयार करण्यासाठीचे भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्या योग्य असावे. पिण्याचे पाणी स्वच्छ भांडयात साठवावे, त्यावर स्वच्छ झाकण झाकलेले असावे व पिण्याचे पाणी निर्जतुकीकरण करूनच पिण्यास द्यावे.
- भांड्याचा वापर करण्यापूर्वी ते भांडी धुण्याच्या साबणाने / द्रावणाने स्वच्छ घासुन व स्वच्छ पाण्याने धुवुनच वापरावीत. भांडी कोरडी करण्यासाठी स्वच्छ कपडयाचा वापर करावा तसेच भांडी स्वच्छ व कोरड्या जागेत ठेवावीत.
हात पुसण्यासाठी स्वच्छ कपडा वापरावा. प्रसाद तयार करणाऱ्या व्यक्तीने हात मोजे व अॅप्रॉन घालावा, तसेच केस संपुर्णपणे झाकणारी टोपी व तोडाला मास्क घालावा. प्रसाद हाताळणा-या सर्व व्यक्तीनी वैयक्तिक स्वच्छतेच्या सर्व नियमांची काळजी पूर्वक अंमलबजावणी करावी.
दरम्यान, प्रसाद स्वतः तयार करुन भाविकांना वितरीत करणा-या गणेश मंडळानी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे नोदणी करावी नोंदणीसाठी FOSCOS.fssai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन 100 रुपये फी भरुन अन्न व औषध प्रशासन यांचेकडे नोंद करून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे तसेच कच्च्या अन्न पदार्थाची खरेदी बिले बाळगावीत व कच्चे अन्न पदार्थ परवानाधारक दुकानातूनच खरेदी करावीत, असे आवाहन सह आयुक्त, अन्न्ा व औषध प्रशासन सु.गं.अन्नपुरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.