Pune School Holiday Traffic Change Advisory: पुणेकरांसाठी एक अत्यंत मोठी अन् महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये 19 ते 23 जानेवारी दरम्यान बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या स्पर्धेमुळे शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 19 जानेवारीला पुणे शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुण्यात शाळांना सुट्टी
समोर आलेल्या माहितीनुसार, 19 जानेवारी 2026 ला या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. या निमित्त पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज तसेच जंगली महाराज रोडवरील वाहतूक सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. शक्य असल्यास कार्यालयांनाही सुट्टी द्यावी किंवा मेट्रोचा वापर करावा, असं आवाहनही पोलीस प्रशासनाने केले आहे.
पुणे जिल्हा प्रशासन यांच्या विद्यमाने व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने "पुणे ग्रॅड चॅलेंज टूर २०२६ अंतर्गत २० जानेवारी २०२६ रोजी आयोजित टप्पा क्रमांक एकच्यावेळी सकाळी ८ वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यासोबत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहे. या स्पर्धेचा टप्पा क्रमांक एक अंतर्गत पौड, लोणावळा ग्रामीण, कामशेत व वडगाव पोलीस स्टेशनहद्दीत एकूण ५३.८ कि.मी अंतर असून स्पर्धेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जारी केले आहेत, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे:
कसा असेल वाहतूक बदल..?
- पौड पोलीस स्टेशन हद्दीत: पर्यायी रस्ता नसल्याने राज्य महामार्ग क्र. १३० वरील घोटावडे गाव बापुजीबुवा मंदिर ते अंबडवेट कमान, एम.डी.आर प्रमुख जिल्हा रस्ता क्र. ११० वरील अंबडवेट कमान ते पौड करमोळी चौक तसेच एम.डी.आर प्रमुख जिल्हा रस्ता क्र. २६ वरील पौड करमोळी चौक ते काशिंग जवण चौक दरम्यान संपूर्ण वाहतूक बंद करण्यात येत आहे.
- लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत: मौजे चावसर, जवन क्र. २, ३ आदी गावाकडून येणारी वाहने मुंबई व पुणे बाजुकडे जाण्याकरिता जवन क्र. १ येथे न येता जवन क्र. २ व ३ चावसर आदी गावातील वाहने ही मौजे तुंगी फाटा मार्गे लोणावळा या पर्यायी मार्गे वळविण्यात येणार आहे.
- मौजे आवेगाव, शिंदगाव आदी गावाकडून येणारी वाहने ही कार्ले फाटा येथे येण्यास बंद करण्यात येणार असून आंबेगाव, शिंदगाव आदी गावातील वाहने ही दुधिवरे मार्गे औंढे औंढोली पुढे लोणावळा या पर्यायी मार्गे वळविण्यात येणार आहे.
- कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत: कडधेगांव हे हिंजवडी, पवनानगर, पौडकडे जाणारे मुख्य जंक्शन असल्याने कामशेत ते पवनानगर पौड अशी जाणारी वाहतूक स्पर्धा संपेपर्यंत संपूर्ण बंद करण्यात येणार आहे.
- कामशेत कि.मी ४५/६०० ओव्हर ब्रीज पवना चौक कामशेत ते पवनानगर, पौड अशी पवनानगर मार्गाकडे जाणारी वाहतूक स्पर्धेच्या दिवशी जुने पुणे-मुंबई हायवे (एनएच ४८) कामशेत कि. मी ४५/६०० ओव्हर ब्रीज पवना चौक या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
- पवनानगर, पौड, आर्डव, शिंवणे, महागांव, शिरगांवकडे जाणारा कामशेतकडून एकचमार्ग असून पर्यायी मार्ग नसल्याने कामशेत ते पवनानगर, पौडकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येत आहे.
- वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत: शिरगाव परंदवडीकडून येणारी वाहतूक बेबडओहोळ मार्गे शिवणे शिवली बाजुकडे न पाठवता जुने मुंबई-पुणे हायवेने वळविण्यात येणार आहे. चांदखेडकडून डोणेकडे येणारी वाहतूक चांदखेड दरम्यान तसेच कामशेतमार्गे थुगांवकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने मौजे कामशेत येथे स्पर्धा संपेपर्यंत संपूर्ण बंद करण्यात येणार आहे.
- मळवंडी ढोरे, येळघोल शिवली गावाकडून आर्डव बाजुकडे येणारी वाहतूक भडवली गावाच्या अलीकडील चौकात येलघोल फाटा येथे सायकल स्पर्धा पूर्ण होईपर्यंत पुर्णपणे बंद करण्यात येत आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Who Will Be Pune's Next Mayor?: पुण्याचा महापौर कोण होणार? 3 नावे आहेत चर्चेत