सुरज कसबे, प्रतिनिधी:
Pune Rain Indrayani River Flood News: गेल्या चार दिवसांपासून मुंबईसह पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आळंदीत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून सर्व पूल बंद करण्यात आले आहेत. अशातच आळंदीमध्ये 250 पेक्षा अधिक नागरिक पाण्यामध्ये अडकल्याचे समोर आले आहे. पोलीस आणि प्रशासनाकडून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले जात आहे.
आळंदीत २५० नागरिक आढळले
मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. आळंदीत सुमारे 250 नागरिक विविध ठिकाणी अडकले असून त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. सर्व पूल पाण्याखाली गेले असल्यामुळे नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाकडून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.कोणीही इंद्रायणी नदीच्या पात्रालगत येऊ नये असं आवाहन नगरपरिषदेकडून नागरिकांना आणि वारकऱ्यांना करण्यात आलं आहे.
Mumbai Pune Rain LIVE: इंद्रायणीने धोक्याची पातळी ओलांडली! 250 नागरिक अडकले; वाचा लाईव्ह अपडेट्स
पुणे–नाशिक महामार्गाचा पर्यायी मार्गही बंद; मोई–फलकेवस्ती रस्ता पाण्याखाली
मुसळधार पावसामुळे मोई–फलकेवस्ती मार्ग पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पुणे–नाशिक महामार्गाला पर्याय म्हणून हजारो वाहनचालक या रस्त्याचा वापर करत होते. मात्र हा मार्गही बंद झाल्याने वाहनचालकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीचा ताण वाढला असून लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पाण्याची पातळी कमी होईपर्यंत या मार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणात आवक पुन्हा वाढवली
पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावरती पाऊस असल्याने उजनी धरणात दौंड बंधाऱ्यातून होणारी पाण्याची आवक पुन्हा वाढवण्यात आली आहे. आज सकाळी सहा वाजता दौंड बंधाऱ्यामधून 14351 क्युसेकने भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.सकाळी दहा वाजता हा विसर्ग वाढवण्यात आला असून तो आता 24049 क्युसेक इतक्या दाबाने करण्यात आला आहे. सध्या वजा 27 पूर्णांक 23 टक्के आहे. दौंड बंधारातून भीमा नदी पात्रात पाण्याची मोठी आवक सुरू असल्याने उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढणार आहे.