देवा राखुंडे, जेजुरी:
Sant Dnyaneshwar Maharaj Mauli Palkhi Accident: महाराष्टाचं अध्यात्मिक वैभव असलेला आषाढी वारी दिंडी सोहळा सध्या सुरु आहे. या वारी सोहळ्यातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीमध्ये भीषण अपघात घडला आहे. एका भरधाव ट्रकने चिरडल्याने तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. जेजुरीजवळील भोंगळे मळा येथे ही दुर्घटना घडली आहे.
माऊलींच्या वारीत भीषण दुर्घटना, तीन वारकऱ्यांचा मृत्यू
समोर आलेल्या माहितीनुसार, सासवड येथील मुक्कामानंतर आज माऊलींची पालखी जेजुरीकडे प्रस्थान करत आहे. या वारीत आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली आहे. पुरंदर तालुक्यातील जेजुरीजवळ टेम्पोच्या धडकेत सहा वारकरी गंभीर जखमी झाले, ज्यामधील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. इतर जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील ही दिंडी होती. या दिंडीत सांगली जिल्ह्यातील अनेक वारकरी होत्या.
राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे, नंदा पवार या तीन महिला या अपघातात मयत झाल्या असून या तीनही महिला सांगली जिल्ह्यातील आहेत. माऊलींची पालखी आज सासवड मधून जेजुरीच्या दिशेने प्रस्थान ठेवते जेजुरीत दाखल झाल्यावर ती पालखीवर भंडाऱ्याची उधळण केली जाते. अशातच हा वारीमधीलच टेम्पो वारकऱ्यांच्या गर्दीत घुसला आणि यामध्ये जवळपास सहा वारकरी गंभीर जखमी झाले, ज्यामधील तिघांचा अंत झाला.
Kolhapur News: बाळाच्या बारशाची लगबग; नवरा, सासू-सासरे हॉल पाहायले गेले; आईने संपवलं आयुष्य