Pune News: केतन अग्रवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! वकिलपत्रावरुन मोठा ड्रामा; सियाच्या भावाला 10 कोटींची नोटीस

महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही वकिलांची कोर्टाच्या आवारातही जोरदार बाचाबाची झाली. सियाचे अधिकृत वकिलपत्र आपल्याकडे असल्याचा दावा दोघांनी केला ज्यामुळे या प्रकरणाला नवे वळण लागलं आहे.   

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड 

Pune Ketan Agarwal Murder Case: पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरण सध्या देशभर चर्चेत आहे. प्रियकराच्या मदतीने सिया गोयलने आपल्या होणाऱ्या पतीची लोहगडावर निर्घृण हत्या केल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नवनवे खुलासे होत असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील आशुतोष श्रीवास्तव यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. 

Lohagad Case: सिया-चेतनला कोर्टात हजर केल्यानंतर काय घडलं? कुणाच्या वकिलांनी काय केला युक्तीवाद? वाचा सविस्तर

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट 

समोर आलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील आशुतोष श्रीवास्तव यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. आशुतोष श्रीवास्तव हे आमचे वकील नसून त्यांना कुटुंबाने कोणतीही अधिकृत नियुक्ती दिलेली नसल्याचा दावा त्याने केला आहे. तसेच  वकील श्रीवास्तव याने फसवणुकीने सियाची स्वाक्षरी घेतली असावी, असा संशय साहिल गोयल यांनी व्यक्त केला आहे. 

Advertisement

यानंतर आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याला अॅडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी थेट 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची कायदेशीर नोटीस बजावली आहे. वडगाव मावळ न्यायालयातील सुनावणीदरम्यान सिया गोयलने "माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून विपुल दुशिंग आहेत," असे सांगितल्याची माहिती समोर आल्यानंतर हा वाद अधिक चिघळला आहे. 

दुसरीकडे साहिल गोयलने खोटे, बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप करून आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याचा दावा करत आशुतोष श्रीवास्तव यांनी 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.  तसेच आरोप मागे घेऊन सार्वजनिक माफी आणि भविष्यात असे आरोप न करण्याचे लेखी आश्वासन देण्याचीही मागणी नोटिशीत करण्यात आली आहे. आता या कायदेशीर नोटिशीला साहिल गोयल काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बाली दौऱ्याबाबत मोठा खुलासा 

 बाली दौऱ्यावर आपणही जाणार होतो, मात्र केतनचा पासपोर्ट हरवल्याने तो दौरा रद्द झाल्याचा खुलासा साहिल गोयलने केला आहे.  केतनचा पासपोर्ट लपवणे हा हत्येच्या कटाचा भाग असल्याचा पोलिसांचा दावा आहे अटकेनंतर सियाशी बोललात का, या प्रश्नावर साहिल यांनी उत्तर देण्यास नकार देत सर्व माहिती न्यायालयात समोर येईल, असे सांगितले. दरम्यान, लोहगड किल्ल्यावरून ढकलून केतन अग्रवालची हत्या केल्याच्या आरोपाखाली सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

नक्की वाचा - Siya Goyal: सोनम सुटली! सिया गोयल ही जामीनावर सुटणार? कोर्टाच्या 'त्या' निकालाने खळबळ