Pune Crime: भावाची मैत्री, क्रिकेटच्या मैदानात नजरानजर... सिया अन् चेतनची प्रेमकहाणी कशी रंगली? मोठी अपडेट

महत्त्वाचं म्हणजे दोन्ही आरोपींनी मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅट, इन्स्टाग्रामवरील संवाद आणि इतर डिजिटल माहिती डिलीट केल्याचा पोलिसांना संशय आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

यशपाल सोनकांबळे, पुणे:

Pune Ketan Agrawal Murder Case:  पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेमकरणातून होणाऱ्या पत्नीनेच केतनची लोहगडावरुन ढकलून देत निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या चौकशीत सिया आणि चेतनची लव्हस्टोरी कशी सुरु झाली? याबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. 

Siya Goyal Viral Video: सियाचा आणखी एक व्हिडीओ समोर, या Video मध्ये तर कहर केला, आई- वडीलांचा दावा...

क्रिकेटच्या मैदानात प्रेम.. 

पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सिया गोयल आणि चेतन अग्रवालची एका क्रिकेटच्या मैदानात पहिल्यांदा ओळख झाली. सियाचा भाऊ साहिल गोयल क्रिकेट सामने खेळायचा. सिया नेहमी भावासोबत क्रिकेट पाहायला जात असे, त्याच ठिकाणी चेतन चौधरी आणि सियाची पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर २०२५ मधील दिवाळीच्या एका मित्राच्या कार्यक्रमात सिया आणि चेतन पुन्हा भेटले.

Advertisement

हळूहळू सिया आणि चेतनच्या भेटीगाठी वाढू लागल्या. दोघांमध्ये असलेले मैत्रीचे नाते बदलले अन् दोघे एकमेकांवर प्रेम करु लागले.  कॉल डिटेल रेकॉर्डनुसार जानेवारीपासून दोघांमध्ये तब्बल २,००४ फोन कॉल झाले. या कॉलचा एकूण कालावधी सुमारे २३८ तासांचा असल्याची माहिती तपासातून समोर आली. शुक्रवारी पोलिसांनी सियाचा भाऊ साहिल गोयल याची सुमारे ५ ते ६ तास चौकशी करून चेतनशी असलेल्या ओळखीबाबत माहिती घेतली.

 या प्रकरणाशी संबंधित सियाच्या इतर नातेवाईकांचेही जबाब नोंदविण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. महत्त्वाचं म्हणजे दोन्ही आरोपींनी मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅट, इन्स्टाग्रामवरील संवाद आणि इतर डिजिटल माहिती डिलीट केल्याचा पोलिसांना संशय आहे. डिलीट केलेला डिजिटल डेटा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आला असून, संवाद पुन्हा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नक्की वाचा - Siya Goyal: लोहगडावर जाण्याचा आग्रह सियाचा नव्हताच, तो आग्रह तर... केतन हत्या प्रकरणाला वेगळं वळण

 दरम्यान, केतनच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी, १७ जून रोजी सिया आणि चेतन यांनी पुण्यातील लुल्लानगर परिसरातील एका कॅफेमध्ये सुमारे एक तास भेट घेतल्याचे तपासात समोर आले. या भेटीत कथित गुन्ह्याबाबत काही चर्चा झाली होती का, याचाही तपास पोलीस करत आहेत.