Pune Election 2026: घड्याळ- तुतारीवरुन वादंग! पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती फिस्कटली; सूत्रांची माहिती

या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी पुण्यातील हॉटेल शांताई येथे महाविकास आघाडीची तातडीची बैठक पार पडली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Mahanagar Palika Election 2026: गामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेली दोन्ही राष्ट्रवादीची युती अखेर फिस्कटल्याची माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची, या कळीच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमधील बोलणी फिस्कटली आहेत.

राष्ट्रवादीची युती फिस्कटली...

​सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या गटाने पुण्यातील सर्व जागांवर 'घड्याळ' चिन्हावरच उमेदवार उभे करण्याचा आग्रह धरला होता. सत्तेत असलेल्या आणि निवडणूक आयोगाकडून अधिकृत नाव व चिन्ह मिळालेल्या अजित पवार गटाला आपले अस्तित्व अधोरेखित करायचे होते. मात्र, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आपल्या 'तुतारी फुंकणारा माणूस' या चिन्हावर ठाम राहिला.

Dombivli News : ब्रँड सांगणाऱ्यांचा बँड वाजवणार, शिंदेंचा ठाकरेंवर डोंबिवलीतून थेट प्रहार, युतीबाबत म्हणाले..

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 'तुतारी'ने मिळवलेले यश पाहता, हे चिन्ह सोडण्यास शरद पवार गटाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते तयार नव्हते. ​चिन्हाचा हा वाद टोकाला गेल्याने अखेर युतीची शक्यता मावळली आहे. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी पुण्यातील हॉटेल शांताई येथे महाविकास आघाडीची तातडीची बैठक पार पडली.

पुण्यात मविआ विरुद्ध महायुती

बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसने यापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास 'स्वबळा'चा नारा दिला होता, मात्र आता युती फिस्कटल्याने महाविकास आघाडी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. आगामी काळात पुण्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.

Advertisement

( नक्की वाचा : Dombivli News : कल्याण-डोंबिवलीतील 27 गावांत निवडणुकीची रणधुमाळी थांबणार? उमेदवारांना थेट इशारा )

दरम्यान, या घडामोडींमुळे पुण्याच्या राजकारणाने पुन्हा एकदा वेगळे वळण घेतले असून, शरद पवार गटाने तातडीने महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. आता राष्ट्रवादी नेमकी मविआसोबत जाणार की पुन्हा राष्ट्रवादीशी चर्चा करार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.