Pune Metro : पुण्यातील वाढत्या वाहतुकीच्या समस्यांवर उपाययोजना म्हणून पुण्यात मेट्रोचं जाळं पसरवण्याचा राज्य सरकारचा प्लान आहे. त्यातील पहिला टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. मात्र पुणेकरांनी मेट्रोकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही महिन्यात पुण्यात मेट्रो प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण होऊन संपूर्ण 33 किलोमीटर मार्गावर मेट्रोसेवा सुरू झाली असली तरी अपेक्षित वेगाने प्रवासी संख्या वाढताना दिसत नाही. मंडई, स्वारगेट ही स्थानके सुरू झाल्यानंतर दैनंदिन प्रवास संख्या दोन लाखांच्या पुढे पोहोचणे अपेक्षित असताना अद्यापही सरासरी प्रवासी एक लाख 60 हजारांच्या दरम्यानच आहे.
नक्की वाचा - Pune News: होणारा नवरा पसंत नाही, नवरीने दिली दीड लाखांची सुपारी, शेवटी जे काही झालं ते...
प्रवाशांना मेट्रोस्थानकापर्यंत सहज जाता यावे यासाठी मेट्रोकडून विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी भावना पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे. सध्याच्या पुण्यातील मेट्रो या रेल्वे स्टेशनला जोडलेल्या नाहीत. याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणांपासून दूर आहेत. त्यामुळे मेट्रोलाचा अपेक्षित वापर होत नसल्याचं सांगितलं जात आहे.
मेट्रोतून प्रवास करणारे दैनंदिन प्रवासी सरासरी 1 लाख 44 हजार, पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गावरील दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या 63 हजार, वनस ते रामवाडी मार्गावरील दैनंदिन प्रवास संख्या 82 हजारांपर्यंत आहेत. गेल्या चार महिन्यांतील प्रवासी संख्या आणि उत्पन्नाबद्दल सांगायचं झालं तर डिसेंबर महिन्यात 46 लाख 94 हजार 147 जणांनी प्रवास केला. यातून मेट्रोला सात कोटी 38 लाख उत्पन्न मिळालं. जानेवारी महिन्यात
49 लाख 64 हजार 224 प्रवासी तर सात कोटी 87 लाख उत्पन्न मिळालं आहे. फेब्रुवारी महिन्यात 43 लाख 7000 जणांनी प्रवास केला तर सहा कोटी 73 लाख उत्पन्न मिळालं आहे. मार्च महिन्यात 44 लाख 81 हजार 613 प्रवासी तर 7 कोटी 1 लाख उत्पन्न मेट्रोला मिळालं आहे.