जाहिरात

Pune MHADA: पुण्यात म्हाडाची बंपर लॉटरी! हायवेलगत 634 घरे.. ती' अटही शिथील; 1BHK, 2BHK ची किंमत किती?

या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) १ BHK आणि मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) २ BHK फ्लॅट्स उपलब्ध असणार आहेत.

Pune MHADA: पुण्यात म्हाडाची बंपर लॉटरी! हायवेलगत 634 घरे.. ती' अटही शिथील; 1BHK, 2BHK ची किंमत किती?

Pune MHADA Lottery:  पुणेकरांसाठी हक्काचे घर घेण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) मुंबई-पुणे हायवेलगत असलेल्या ताथवडे (फेज २) येथे ६३४ सदनिकांच्या विक्रीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम लोकेशनवर घरे उपलब्ध करून देण्याची योजना म्हाडाने आखली आहे.

पुण्यात घर घेण्याचे स्वप्न करा साकार!

​यंदाच्या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उत्पन्नाची अट शिथील करण्यात आली असून, सर्व उत्पन्न गटातील नागरिकांना या सदनिकांसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. उत्पन्नाचा पुरावा म्हणून १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ किंवा १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या आर्थिक वर्षांपैकी एका वर्षाचे उत्पन्न ग्राह्य धरले जाईल.

यासाठी आयकर विवरण पत्र (ITR) किंवा तहसीलदारांचा दाखला देणे बंधनकारक आहे. ग्राहकांना घराची प्रत्यक्ष पाहणी करता यावी, यासाठी 'सॅम्पल फ्लॅट' देखील खुला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) १ BHK आणि मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) २ BHK फ्लॅट्स उपलब्ध असणार आहेत.

Mumbai Water Supply: मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात! BMCकडून महत्त्वाचं आवाहन; नेमकी काय काळजी घ्याल?

​ताथवडे येथील या प्रकल्पात खाजगी विकासकांना टक्कर देणाऱ्या अत्याधुनिक सुविधा दिल्या जाणार आहेत. यामध्ये मोफत क्लब हाऊस, चार चाकी वाहन पार्किंग, ओपन जिम, योगा आणि मेडिटेशन रूम, स्विमिंग पूल, मल्टिपर्पज हॉल, ईव्ही चार्जिंग स्टेशन, इंडोअर गेम एरिया, मुलांसाठी खेळण्याची जागा आणि सोलर ऑन-ग्रिड सिस्टमचा समावेश आहे. या योजनेत १ BHK फ्लॅटची किंमत ४६ लाखांपासून सुरू होत असून, २ BHK फ्लॅट ६४.५ लाखांपर्यंत उपलब्ध आहेत. 

कोणकोणती कागदपत्रे लागणार?

  • पासपोर्ट आकाराचा फोटो (50 KB पर्यंत)
  • व्हॉट्सअप क्रमांकासह चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
  • पॅन कार्ड आणि आधार कार्ड
  • बँकेचा रद्द केलेला चेक किंवा पासबुकचे पहिले पान
  •  2018 नंतरचे वय आणि रहिवासी प्रमाणपत्र (डोमासाईल सर्टिफिकेट)

नक्की वाचा >> Pune News: नाणेघाटात पर्यटकांच्या जीवाला धोका, धुक्यामुळे अक्राळविक्राळ घडलं, मित्रांनी आरडाओरडा केला, पण.. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com