जाहिरात

Moshi Incident: 'सगळा अंधार झाला अन् आम्ही अडकलो', 6 तास समोर साक्षात मृत्यू; मोशी दुर्घटनेचा थरारक अनुभव

थरारक दुर्घटनेतून तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात आलेल्या सुजाता शिंदे यांनी आपला अंगावर काटा आणणारा अनुभव प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितला आहे.

Moshi Incident: 'सगळा अंधार झाला अन् आम्ही अडकलो', 6 तास समोर साक्षात मृत्यू; मोशी दुर्घटनेचा थरारक अनुभव

सुरज कसबे, पुणे:

Moshi Building Collapse News: मोशी येथील कचरा डेपो परिसरात दुर्घटनाग्रस्त इमारतीचा मलबा हटविण्याचे काम गेल्या ४० तासांहून अधिक काळ युद्धपातळीवर सुरू आहे. मलब्याखाली अडकलेल्या ८ कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ (NDRF) आणि भारतीय लष्कराचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत, मात्र अद्यापपर्यंत कोणाचाही शोध लागलेला नाही आहे.  या थरारक दुर्घटनेतून तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात आलेल्या सुजाता शिंदे यांनी आपला अंगावर काटा आणणारा अनुभव प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितला आहे. 

Pune Palkhi Sohla: पुणे मनपाकडून गोरगरीब वारकऱ्यांची लूट, धक्कादायक VIDEO समोर, मोफत सेवेचा दावाही खोटा

जेवायला बसणार इतक्यात अनर्थ... काय म्हणाल्या सुजाता शिंदे?

आम्ही जेवायला बसलो होतो, काही जण जेवण करत होते, तर काही जण नुकतेच जेवणासाठी आले होते. अचानक कचऱ्याचा ढीग येतोय म्हणून ओरडाओरड झाली आणि जीव वाचवण्यासाठी आम्ही दरवाजाच्या दिशेने धावलो. पण तेवढ्यात सगळीकडे अंधार झाला आणि आम्ही तिथेच अडकलो,अशा शब्दांत सुजाता शिंदे यांनी त्या वेळची भीषणता मांडली.

"सुरुवातीला काय घडले हे काही वेळ समजलेच नाही, मात्र नंतर शेजारी असलेल्या सहकाऱ्यांचे आवाज आले. आम्ही एकमेकांना धीर देत आम्हाला मदत करा म्हणून ओरडत होतो, असे सांगताना सुजाता शिंदे यांच्या चेहऱ्यावर त्या काळरात्रीची भीती स्पष्ट दिसत होती. अखेर बचाव पथकाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सहा तासांच्या थरारानंतर त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

दरम्यान, या दुर्घटनेकडे लोकप्रतिनिधींनी मात्र पाठ फिरवल्याचा आरोप अडकलेल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांनी केला आहे. घटना घडल्यानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांनी बचावकार्याची माहिती घेतली, सूचना दिल्या. पण दुर्घटनास्थळी आल्याचं नाहीत.  मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन दुर्घटनेदिवशी संध्याकाळी आठ ते मध्यरात्री दोन दरम्यान दोन वेळा येऊन गेले.

Solapur News: 115 वर्षांचा लढा संपला! सोलापूरकरांसाठी ऐतिहासिक निर्णय, विधानसभेत मोठी घोषणा; 9000 कुटुंबांना..

शरद पवार राष्ट्रवादीचे स्थानिक खासदार अमोल कोल्हे एकदा ही फिरकले नाहीत. भाजपचे स्थानिक आमदार महेश लांडगे दुर्घटनेदिवशी एकदा आले. महापौर रवी लांडगे दुर्घटना घडल्यावर काही वेळात एकदा आणि नंतर मंत्री गिरीश महाजनांसोबत दुसऱ्यांदा आले. पण काल दिवसभर ते फिरकले नाहीत, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com