Pune News : ग़लती से मिस्टेक हो गया; पुण्यात हिंदू आंदोलकांकडून मोठी चूक, औरंगजेबाऐवजी दुसऱ्याचाच फोटो जाळला

पुण्यातही हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मात्र यातील एका संघटनेकडून मोठी चूक झाल्याचं उघड झालं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Aurangzeb's Tomb : सध्या राज्यभरात औरंगबादच्या कबरीवरुन वातावरण तापलं आहे. भाजपच्या नेत्यांसह विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाकडून कबर हटविण्याची मागणी केली जात आहे. परिणामी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मात्र हिंदू संघटना दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत असल्याचं दिसत आहे. बाबरीप्रमाणे औरंगजेबाची कबरही पाडण्यासाठी रथयात्रा काढणार की काय अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पुण्यातही हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मात्र यातील एका संघटनेकडून मोठी चूक झाल्याचं उघड झालं आहे. औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा निषेध करण्यासाठी पतित पावन संघटनेच्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आलं. मात्र, या आंदोलनात आंदोलनकर्त्यांकडून मोठी चूक झाली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी औरंगजेबाऐवजी चक्क मुघल बादशहा बहादूर शाह यांचा फोटो जाळला. ‘पतित पावन'च्या आंदोलनातील ही घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Aurangzeb's Tomb : देशात पुन्हा कारसेवा होणार? औरंगजेबाच्या कबरीवरील बंदोबस्त वाढवला, विश्व हिंदू परिषद आक्रमक  

राज्यात सध्या औरंगजेबावर मोठा वाद सुरू असून वातावरण तापलं आहे. आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे गुणगान गायल्यानंतर विविध संघटनांनी त्याला जोरदार विरोध केला आहे. त्यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. औरंगजेब एक क्रूर शासक होता आणि हिंदू धर्मीयांवर अत्याचार करणारा बादशहा होता, असे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे औरंगजेबाचा गौरव करणाऱ्या वक्तव्यांवर सातत्याने आक्षेप घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर रविवारी पुण्यात पतीत पावन संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र, यावेळी औरंगजेबाऐवजी बहादूर शाह जफर यांचा फोटो जाळण्याची चूक घडली.

पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा निषेध करण्यासाठी पुण्यात आंदोलन केलं. मात्र, या आंदोलनादरम्यान आंदोलकांकडून मोठी गफलत घडली. आंदोलकांनी औरंगजेब समजून चक्क मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांच्या फोटोला चपलांचा हार घालून तो जाळला. या चुकीमुळे आता या आंदोलनाची चर्चा रंगली आहे.

Advertisement