Pune-Mumbai expressway News: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) द्रुतगती मार्गाच्या मोठ्या सुधारणेची योजना आखत असल्याने, मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होण्याची शक्यता आहे. वाहनांची वाढती संख्या आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन, प्रशासनाने सध्याचा मार्ग १० पदरी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील टोलवसुलीचा कालावधी 15 वर्षांनी वाढणार असा अंदाज वर्तवला जात आहे.
Thane News: ठाणेकरांची चिंता वाढली! 3 दिवसांत 6 मुले गायब, नेमकं काय घडतंय?
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील टोलवसुलीचा कालावधी 15 वर्षांनी वाढणार ?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक 1 मेपासून सुरू होणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पानंतर या मार्गाच्या दहा पदरीकरणासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. या कामासाठी अवाढव्य खर्च अपेक्षित असून हा खर्च भरून काढण्यास सरकारने नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे 2045 सालानंतरही टोलवसुली सुरू राहील अशी शक्यता आहे. सध्या टोलवसुलीला 2045 पर्यंतची मुदत दिली आहे. ही मुदत आणखी 15 वर्षांनी वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
एक्सप्रेसवेच्या 10 पदरीकरणासाठी 15 हजार कोटींच्या खर्चाचा अंदाज आहे. या खर्चाच्या आर्थिक तरतुदीसाठी राज्य सरकारने नकार दिला आहे. त्यामुळे खर्च भरून काढण्यासाठी टोलवसुलीला आणखी 15 वर्षांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आहे. दरम्यान, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम येत्या पावसाळ्यानंतर सुरू होणार असल्याची माहिती MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी दिली. हा प्रकल्प पुढील 3 वर्षांत, म्हणजेच साधारणपणे 2029-30 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Pune News: पुणे हादरलं! दारूच्या नशेत चोरली PMPML बस आणि सुसाट सुटला; FC रोडवर हजारो जीव टांगणीला)