PMC Election 2026: 'हाच का दादांचा वादा?' सभेआधी अजित पवारांना 3 बोचरे सवाल; बॅनरमुळे राजकारण तापलं

"हाच का दादाचा वादा?" असा बोचरा सवाल करत मतदारांनी अजित पवारांच्या  विकासकामांच्या दाव्यांनाच आव्हान दिले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंंगवे, पुणे:

Pune Municiple Corporation Election 2026: पुणे महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे.  पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचारसभांचा धडाका सुरु केला असून थेट भाजपवर निशाणा साधत त्यांनी मित्रपक्षांचीच कोंडी केली आहे. आजही सायंकाळी अजित पवार यांची पुण्यामध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेआधी थेट अजित पवार यांनाच प्रश्न विचारणारे निनावी बॅनर्स झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. 

अजित पवार यांच्या सभेआधी बॅनरबाजी...

पुणे महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. अशातच, प्रभाग क्रमांक ९ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट सवाल करणारे निनावी बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. "हाच का दादाचा वादा?" असा बोचरा सवाल करत मतदारांनी अजित पवारांच्या  विकासकामांच्या दाव्यांनाच आव्हान दिले आहे.

PCMC Election 2026 : एबी फॉर्म गहाळ, उच्च न्यायालयात धाव; अखेर अजित पवारांच्या उमेदवाराला मोठा दिलासा

​प्रभाग क्रमांक ९ मध्ये आज संध्याकाळी अजित पवार यांची जाहीर सभा होत आहे. मात्र, सभेपूर्वीच परिसरात लागलेल्या या बॅनरनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या बॅनरवर प्रामुख्याने तीन मुद्दे मांडण्यात आले आहेत "अजितदादा, तुम्ही अशा लोकांचा प्रचार करणार का?" असा प्रश्न विचारून नाराज मतदारांनी पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेष म्हणजे, हे बॅनर कुण्या राजकीय पक्षाचे नसून "प्रभाग ९ मधील नाराज मतदार" या नावाने लावण्यात आले आहेत.

काय आहेत बॅनरवरील सवाल? 

  • हाच का दादाचा वादा? अजितदादा तुम्ही प्रभाग क्र ९ मध्ये पैसे वाटणाऱ्यांच्या प्रचार करणार का ? हाच का दादाचा वादा?
  • अजितदादा तुम्ही प्रभाग क्र ९ मध्ये जमिनी लाटणाऱ्यांचा प्रचार करणार का ? हाच का दादाचा वादा?
  • अजितदादा तुम्ही प्रभाग क्र ९ मध्ये अवैध धंदे करणाऱ्यांचा  प्रचार करणार का ? हाच का दादाचा... वादा?
  • दादा तुमच्यकडून ही अपेक्षा नव्हती...
  •  तुमच्यावर मनापासून प्रेम करणारे परंतु प्रचंड नाराज असणारे प्रभाग क्र ९ मधील सर्व मतदार.

    Ajit Pawar News: '...म्हणून पुण्यातील रस्त्यांवर खड्डे', अजित पवारांचा भाजप नेत्यांवर निशाणा

पुण्यातील राजकारणात अजित पवारांचे वर्चस्व सर्वश्रुत आहे. मात्र, यंदाची निवडणूक ही केवळ सत्तेची नसून प्रतिष्ठेची बनली आहे. प्रभाग ९ मधील उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवरून किंवा त्यांच्या कार्यपद्धतीवरून हा असंतोष उफाळून आल्याचे दिसत आहे. आजच्या सभेत अजित पवार या बॅनरबाजीला आपल्या खास शैलीत कसे प्रत्युत्तर देतात, याकडे आता संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे. 

Advertisement