Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाचं! शहरातील अत्यंत वर्दळीचा पूल 3 महिने बंद; वाहतुकीचा मोठा खोळंबा

मेट्रोच्या सुरू असलेल्या कामामुळे हा पूल आगामी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी वाहतुकीस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे: 

Pune Bhide Bridge Closed:  पुणेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अन् मोठी बातमी समोर आली आहे. पुणेकरांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या, सर्वाधिक वर्दळ असलेला आणि  मध्यवस्तीला जोडणाऱ्या भिडे पुलाबाबत प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मेट्रोच्या सुरू असलेल्या कामामुळे हा पूल आगामी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी वाहतुकीस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. 

Ujjwala Yojna: सर्वसामान्यांना 'जोर का झटका', उज्ज्वला गॅस योजनेत सर्वात मोठा बदल; आता फक्त...

पुण्यातील भिडे पूल 3 महिने राहणार बंद 

​महामेट्रो प्रशासनाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला मुख्य प्रवासाशी जोडण्यासाठी एक विशेष पादचारी पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा पादचारी पूल भिडे पुलाच्या अगदी वरच्या बाजूला उभारला जात असल्याने, कामादरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये आणि नागरिकांची सुरक्षितता जपली जावी, यासाठी पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

९ जूनच्या मध्यरात्रीपासून ते ५ सप्टेंबर या कालावधीत पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद असेल. ​मेट्रोचे हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. मात्र, पुलाचे महत्त्व पाहता ही बंदी वाहतुकीच्या दृष्टीने गैरसोयीची ठरणार आहे. या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. शहराच्या मुख्य भागातील वर्दळ लक्षात घेता, प्रशासनाने या तीन महिन्यांच्या काळात नियोजित वेळेत काम पूर्ण करावे, अशी मागणी पुणेकरांकडून होत आहे.

Pune News : 'वेश्यावस्तीत येणारा प्रत्येक पुरुष वाईट नसतो'; बुधवार पेठेतील अशी बाजू ज्यापासून आपण सारे अनभिज्ञ