Pune News: हर्षवर्धन सपकाळांच्या विधानावरुन वाद! भाजप आक्रमक; पुण्यात गुन्हा दाखल

भारतीय जनता पक्षाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी स्वतः पर्वती पोलीस ठाण्यात उपस्थित राहून याप्रकरणी अधिकृत तक्रार दिली.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पिंपरी- चिंचवड

Pune News:  राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानावरुन नवा वाद उभा राहिला आहे. छत्रपती शिवरायांच्या समकक्ष टिपू सुलतान यांना पाहिले पाहिजे. कारण त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात शौर्य गाजवले, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. त्यांच्या या विधानावरुन सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजपनेही हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल 

पुण्याचे राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सपकाळ यांनी केलेल्या कथित प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  भारतीय जनता पक्षाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी स्वतः पर्वती पोलीस ठाण्यात उपस्थित राहून याप्रकरणी अधिकृत तक्रार दिली.

Rahul Narwekar : अलिबागच्या शेतात नेमकं काय घडलं? राहुल नार्वेकरांना शेतकऱ्याने का झापलं? वाचा सर्व माहिती

 हर्षवर्धन सपकाळ यांचे हे वक्तव्य सामाजिक सलोखा बिघडवणारे असल्याचा दावा भाजपने केला आहे.  सपकाळ यांच्या वक्तव्यांमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या विधानाचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

चौकशी सुरु

या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून, त्यांच्यावर  भारतीय न्याय संहिता 192, 96(1) , 196( 2) 352, 356 ( 1)  या कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या कायदेशीर कारवाईमुळे काँग्रेस आणि भाजपमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता पोलीस याप्रकरणी पुढील काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

( नक्की वाचा : Satara News: साताऱ्यातील शेतकऱ्याला 1 कोटी 80 लाखांचा गंडा,मुंबईच्या नगरसेविकेसह मंत्रालयातील 'बाबू' रडारवर! )