Pune News: फिरायला जाताय.. पुणे जिल्ह्यातील 'या' पर्यटन स्थळांवर बंदी, उल्लंघन केल्यास होणार कारवाई

Tourist Places Ban Pune District: हिरमोड झालेल्या पर्यटकांना भुशी धरणाच्या पायऱ्यांवर भिजण्याचा आनंद घेता येणार आहे. हा आदेश 31 ऑगस्ट 2025 पर्यंत लागू असेल.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पुणे: पावसाने यंदा मान्सूनपूर्वीच हजेरी लावली आहे. त्यामुळं निसर्ग ही बहरुन गेलाय. हे पाहता जर तुम्ही लोणावळा अथवा मावळ तालुक्यात वर्षाविहाराचे नियोजन करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण लोणावळा आणि मावळ तालुक्यातील बहुतांश पर्यटनस्थळी पर्यटकांना सक्तीची मनाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी अख्ख कुटुंब धबधब्यात वाहून गेलं होते. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतलेली आहे.

त्या अनुषंगाने पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या पर्यटनस्थळी कलम 163 लागू केले आहे.  या दरम्यान पर्यटकांनी या पर्यटनस्थळी जाऊन नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. या पर्यटनस्थळातून भुशी धरण मात्र वगळण्यात आलेलं आहे, त्यामुळं हिरमोड झालेल्या पर्यटकांना भुशी धरणाच्या पायऱ्यांवर भिजण्याचा आनंद घेता येणार आहे. हा आदेश 31 ऑगस्ट 2025 पर्यंत लागू असेल.

Pimpri Chinchwad Crime: शादी डॉटकॉमवर ओळख, CEO असल्याची बतावणी अन्... उच्चशिक्षित तरुणीसोबत धक्कादायक प्रकार

पर्यटकांना कुठं-कुठं मनाई करण्यात आली आहे ?

एकवीरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना डॅम या परीसरात पर्यटकांमुळे गर्दी होत असून त्यावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्बंध घालण्याची बाब निदर्शनास आणून दिलेली आहे. त्यानुसार भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 प्रतिबंधात्मक आदेश पुणे जिल्हाधिकारी डुडी यांनी लागू केलेत.

त्यामुळं या पावसाळयात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता दि.07/06/2025 ते दि.31/08/2025 पर्यंत हा प्रतिबंधात्मक आदेश लागू केला  आहे.

Advertisement

Tatkal Ticket Booking Rule: रेल्वेतिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! केवळ 'याच' लोकांना मिळणार तत्काळ तिकीट; काय आहे नवा नियम?