Pune Accident: पुण्यात हिट अँड रन! भरधाव डंपरने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं, 3 जण ठार

पुण्यामध्ये एका मद्यधुंद डंपर चालकाने भरधावपणे डंपर चालवत 9 जणांना चिरडल्याची थरारक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे,पुणे: पुणे शहरातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये एका मद्यधुंद डंपर चालकाने भरधावपणे डंपर चालवत 9 जणांना चिरडल्याची थरारक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती ्अशी की, वाघोली येथील केसनंद फाट्यावरती पुण्याकडून येणाऱ्या भरघाव बिल्टवेस् इंटरप्राईजेस कंपनीच्या डंपरने फूट पाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.

यामध्ये मुलांच्या काकांसह दोन बालकांचा समावेश आहे तर सहा जण  गंभीर जखमी झाले. जखमीमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. रात्री बार ते एक वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्यावर पोलीस ठाण्याच्या समोरच ही घटना घडली. 

वैभवी रितेश पवार (1 वर्ष), वैभव रितेश पवार (2 वर्ष) आणि रीनेश नितेश पवार (30 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. याशिवाय अन्य सहा जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  हे सर्व लोक अमरावतीहून पुण्यात मजुरीसाठी आले होते आणि फूटपाथवर झोपले होते.

Advertisement

नक्की वाचा - Guardian Minister : खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच; संजय शिरसाटांनी आधीच केलं जाहीर

अपघातावेळी डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. वाघोली पोलीस ठाण्यासमोर ही घटना घडल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

दरम्यान, या दुःखद घटनेने रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आवश्यक पावले उचलणे अपेक्षित आहे.

Advertisement

Topics mentioned in this article