सागर कुलकर्णी, पुणे: मोटर नर्व्ह फायबरवर परिणाम करणाऱ्या गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) च्या तीव्र मोटर अॅक्सोनल न्यूरोपॅथी (AMAN) प्रकारामुळे पहिला मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. पिंपरीच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट-यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या 64 वर्षीय महिला रुग्णाचा या आजाराने मृत्यू झाला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, पुणे जिल्ह्यात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) प्रकरणांमध्ये संशयास्पद वाढ झाल्यानंतर हा पहिलाच मृत्यू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरातील नागरिक सध्या एका दुर्मिळ आजाराचे अनेक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे अनेक रुग्ण सापडत आहेत. अशातच आता या आजाराच्या संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरीच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट-यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या 64 वर्षीय महिला रुग्णाचा या आजाराने मृत्यू झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुणे जिल्ह्यात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) प्रकरणांमध्ये संशयास्पद वाढ झाल्यानंतर हा पहिलाच मृत्यू आहे. मृत महिलेला उच्च रक्तदाब असल्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे गुईलन बारी सिंड्रोमचे (GBS) आणखी सहा रुग्ण आढळले असून, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 73 वर पोहोचली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी डॉक्टरांच्या पथकाला स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार, 14 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. राज्य आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, एकूण 73 रुग्णांपैकी 44 रुग्ण ग्रामीण पुण्यातून, 11 रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातून, तर 15 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातून आहेत. तसेच सर्वाधिक 14 रुग्ण हे किरकीट वाडी येथील आहेत.
( नक्की वाचा : Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी बनली किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर, महाकुंभात केले पिंडदान, Video )
त्यानंतर DSK विश्व येथे आठ, नांदेड सिटी येथे सात, आणि खडकवासला येथे सहा रुग्ण आढळले आहेत. पुणे महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, 73 रुग्णांपैकी 48 पुरुष, 24 महिला असून, तीन रुग्ण पाच वर्षांखालील आहेत. पुण्यात अचानक वाढलेल्या GBS प्रकरणांवर राष्ट्रीय पातळीवरील सेंटर सर्व्हिलन्स युनिटने लक्ष दिले आहे. त्यांनी राज्य आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली आहे.