Pune News: बिबट्या उधळतोय प्रचाराच्या सभा! जाहीरनाम्यातही त्याची दहशत, पुण्यात काय घडतंय?

बिबट्यांच्या या दहशतीमुळे सायंकाळी दिवस मिळवल्यानंतर प्रचार थांबवावा लागत आहे. अनेक नेत्यांना याचा फटका बसला आहे. ​

जाहिरात
Read Time: 2 mins

Leopard fear darkens On Election Campaign: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधुम सुरु आहे. एकीकडे निवडणुकांच्या प्रचार सभांचा धडाका सुरु असतानाट मंचर, आंबेगाव आणि जुन्नर या तीन महत्त्वाच्या राजकीय क्षेत्रांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्यच्या दहशतीचा प्रचारावर मोठा परिणाम होत असून उमेदवारांना प्रचारसभा आटोपत्या घ्याव्या लागत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने यासंबंधी वृत्त दिलं आहे.  नेमकं काय घडतंय? वाचा...

बिबट्याचा राडा, प्रचारात खोडा!

पुण्यातील मंचर, आंबेगाव, जुन्नर या भागात बिबटे सर्रास शेतात आणि अन्नाच्या शोधात निवासी भागात फिरताना दिसत आहेत. बिबट्यांच्या या दहशतीमुळे सायंकाळी दिवस मिळवल्यानंतर प्रचार थांबवावा लागत आहे. अनेक नेत्यांना याचा फटका बसला आहे. ​मंचर नगरपंचायत निवडणूक लढवणाऱ्या राजश्री गांजळे या शिवसेनेच्या उमेदवाराने आपला प्रचार सायंकाळी 6.30 वाजता संपवला. 

Mumbai News : पुण्यानंतर मुंबईतही बिबट्या? प्रसिद्ध उद्यानाच्या सीमाभागात वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून गस्त

​आंबेगाव, मंचर आणि जुन्नरमधील उमेदवारांना बिबट्याच्या वाढत्या दर्शनामुळे आणि हल्ल्यांमुळे दिवसाच प्रचार करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. अत्यंत धीट असलेले उमेदवारसुद्धा एकदा अंधार पडला की बाहेर थांबण्यास नकार देतात. मतदारही सायंकाळच्या भेटी स्पष्टपणे टाळतात आणि सूर्यास्तानंतर घराबाहेर पडण्यास तयार नसतात. प्रचारात सहभागी होणारे पक्ष कार्यकर्तेसुद्धा रात्री बाहेर पडणे टाळत आहेत. 

 नेत्यांची होतेय धावपळ...

बिबट्याच्या भीतीची दखल घेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या नेत्यांनीसुद्धा त्यांच्या प्रचारसभा सकाळच्या किंवा दुपारच्या वेळेत हलवल्या आहेत. "स्टार प्रचारक लोक निवांत झाल्यावर म्हणजे संध्याकाळी प्रचार करायला प्राधान्य देतात," असे जुन्नरमधील विशाल पाटील म्हणाले. बिबट्याच्या भीतीमुळे रणनीती बदलावी लागली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

Advertisement

Pre Marriage Tips: लग्नाआधी मुलं- मुली Google वर काय सर्च करतात? सर्च हिस्ट्री वाचून हैराण व्हाल!

महत्त्वाचं म्हणजे बिबट्याच्या भितीमुळे नेत्यांना जाहीरनामेही बदलावे लागत आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराल? असा सवाल या भागातील मतदार विचारत आहेत. त्यासाठी उमेदवारांनाही त्यासंबंधी आश्वासने द्यावी लागत आहेत. आम्ही बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणी पिंजरे लावण्याची मागणी केली आहे. आमच्या मुलांची सुरक्षा ही आमची सर्वात मोठी चिंता आहे, असं आश्वासन हे उमेदवार देत आहेत.