शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन 2026 मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हे वेळापत्रक आयोगाच्या http://mpsc.gov.in व http://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव र. प्र. ओतारी यांनी दिली आहे. या संकेतस्थळावर सर्व परिक्षार्थींना संपूर्ण वेळापत्रक पाहाता येणार आहे.
प्रस्तावित वेळापत्रकानुसार सन 2026 मध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा-2025, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-2025, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2025, महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-2025, महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा-2025, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा-2025, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा होणार आहेत.
या शिवाय महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा-2026, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा-2026 व महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा-2026 इत्यादी परीक्षा होणार आहेत. MPSC मार्फत या परिक्षा घेतल्या जातात. अनेक दिवसापासून या परिक्षां कधी जाहीर होणार याची वाट पाहील जात होती. अभ्यास करणाऱ्या परिक्षार्थिंना ही परिक्षा जाहीर झाल्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.